ST Reservation : राज्यातील एसटी समाज भाजपबरोबर राहणार, आरक्षण मिळणार : गोपाळ सुर्लकर

ST Reservation : आम्हाला भाजप सरकारनेच आतापर्यंत दिला न्याय
ST Reservation
ST ReservationDainik Gomantak

ST Reservation :

साखळी, राज्यात आदिवासींना राजकीय आरक्षण लवकरच मिळणार असून यासाठी भाजप सरकारने केलेले प्रयत्न यावर गोव्यातील आदिवासी नागरिक खूष झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संपूर्ण गोव्यातून अभिनंदन होत असून भविष्यात एसटी समाजबांधव हे भाजप सरकार व पक्षाबरोबरच राहणार आहेत. आतापर्यंत या समाजाला भाजपनेच न्याय दिला आहे, असे पाळी मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एसटी समाजाकडून या ऐतिहासिक कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जाहीर आभार व्यक्त केले जात आहे.

या राजकीय आरक्षणाबरोबरच भाजप सरकारने व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्यातील एसटी समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. त्यांचाही लाभ आज या समाजातील लोकांना मिळत आहे. त्यामुळे या समाजातील लोक हे भाजप सरकारवर खूष आहेत, असेही सुर्लकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला पाळीचे सरपंच शिवदास मुळगावकर, पंच प्रशीला गावडे, सुर्लचे माजी सरपंच चंद्रकांत घाडी व अनिल कुंडईकर यांची उपस्थिती होती.

ST Reservation
Monkey Fever In Goa: सत्तरीत पुन्हा माकड ताप! आरोग्य यंत्रणा सतर्क, आतापर्यंत 'एवढ्या' जणांना झालीय लागण

गेली अनेक वर्षे एसटी समाज हा आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी झगडत आहे. त्यांची दखल कोणीच घेतली नव्हती. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच या समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे, असे प्रदीप गावडे यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत घाडी, शिवदास मुळगावकर, प्रशिला गावडे यांनीही आपली मते मांडली.

२०२७ पर्यंत राजकीय आरक्षण

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या समाजाला दिलेला आपला शब्द पाळताना निवडणुकीपूर्वी एसटीबांधवांना राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रक्रियेत आणला आहे. आता त्यावरील प्रक्रिया होऊन येत्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या समाजाला राजकीय आरक्षण मिळणार आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असताना काँग्रेस पक्ष अपप्रचार करीत आहे.

वास्तविक काँग्रेस पक्षाने आतापर्यंत एसटी समाजातील लोकांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. त्यांच्याकडे या समाजाला राजकीय आरक्षण देऊन वर आणण्याची संधी होती. परंतु त्यांनी या समाजाला कधीच प्रमुख प्रवाहात आणले नाही. काँग्रेसचा आज खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. त्यामुळे आता लोकांची साथ केवळ भाजपलाच मिळणार, असा विश्वास सुर्लकर यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com