Monkey Fever In Goa: सत्तरीत पुन्हा माकड ताप! आरोग्य यंत्रणा सतर्क, आतापर्यंत 'एवढ्या' जणांना झालीय लागण

Monkey Fever In Goa: 2014-15 वर्षी राज्याच्या उत्तरेतील सत्तरी य भागात माकड तापाने धुमाकूळ घातला होता.
Monkey Fever
Monkey FeverDainik Gomantak
Published on
Updated on

Monkey Fever In Goa: सत्तरीत पुन्हा एकदा माकड तापाने डोके वर काढले आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान या भागात 3 रुग्ण सापडल्याने आरोग्यविभागासह स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र सद्य स्थितीत त्या तिन्ही रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर आवश्यक ते उपचार करुन घरी पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

2014-15 वर्षी राज्याच्या उत्तरेतील सत्तरी य भागात माकड तापाने धुमाकूळ घातला होता. या तापामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती.

विशेष म्हणजे ऐन काजूच्या हंगामात या तापाची साथ परसरल्याने जे लोक काजू बागेत जायचे अशांना या तापाची चटकन लागण होत असल्याचेही समोर आले होते.

दरम्यान मागील काही वर्षांपासून माकड तापाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र यंदा पुनः एकदा माकड तापाने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. सत्तरीतील हिवरे आणि गोळावली या गावात अनुक्रमे 2 आणि 1 रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे.

सध्या या तिन्ही रुग्णांवर वाळपई आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून तिघांचीही प्रकृती स्थिर असून त्याच्यावर आवश्यक ते उपचार करुन घरी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास नाईक यांनी दिली आहे.

आरोग्य खात्याने पावले उचलली:-

सत्तरीत पुन्हा एकदा माकडतापचें रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गावात माकडतापाविषयी जनजागृती करण्यास आरोग्य खात्याने पावले उचलली आहेत.

सध्या काजूचा हंगाम असल्याने काजू बागायती तसेच रानात फिरणाऱ्या लोकांनी सतर्कता बाळगत अआरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.

Monkey Fever
Goa Govt Locker: 32 वर्षानंतर उघडली तिजोरी अन् गोवा सरकारला सापडले घबाड; सोने, दागिने, जुनी नाणी यांचा समावेश

2014-15 मध्ये तापाची लागण:-

सत्तरीत या आधीही माकडतापाचा फैलाव झाला होता. 2014-15 या सालात याच माकड तापामुळे 4 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. गोव्यालगतच्या सिंधुदुर्गातही या माकड तापाने त्यावेळी थैमान घातले होते.

धक्कादायक म्हणजे सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे मृत माकड सापडले असून दोडामार्ग तालुक्यातील कित्येकांना या तापाची लागण झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com