Canacona News :आंगले उच्च माध्यमिकचे राष्ट्रीय खेळांमध्ये यश

Canacona News :वेळीप यांनी आधुनिक पेंटॅथलॉन ट्रायथल आणि टेट्राथलॉनमध्ये प्रत्येकी दोन कांस्यपदके जिंकली ज्यात स्विम शूट आणि तलवारबाजीचा समावेश आहे.
S.S Angle Higher Secondary School Student With Teacher
S.S Angle Higher Secondary School Student With Teacher Dainik Gomantak
Published on
Updated on

Canacona News : काणकोण, माशे येथील एस. एस. आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये राज्यात सर्वाधिक पाच पदके पटकावली आहेत.

त्यात चंद्रहास वेळीप, दर्शन वेळीप, प्रज्ञा गोसावी, साहिली वेळीप, नेहा कोळेकर आणि ग्लेन्सन डायस या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पाच पदके जिंकली. चंद्रहास वेळीप आणि दर्शन वेळीप यांनी आधुनिक पेंटॅथलॉन ट्रायथल आणि टेट्राथलॉनमध्ये प्रत्येकी दोन कांस्यपदके जिंकली ज्यात स्विम शूट आणि तलवारबाजीचा समावेश आहे.

S.S Angle Higher Secondary School Student With Teacher
Goa Politics: नोकरभरती घोटाळा तक्रारीची दखल न घेतल्‍यास न्‍यायालयात; एल्विस गोम्‍स

प्रज्ञा गोसावीने मिनी गोल्फ महिलांच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत कास्यपदक पटकावले. ग्लेन्सन डायसने ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला, नेहा कोळेकर हिने मिनी गोल्फमध्ये आणि साहिली वेळीप हिने लेझर रन स्पर्धेत आधुनिक पेंटॅथलॉनमध्ये भाग घेतला. विद्यालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com