Sports News
Sports NewsDainik Gomantak

'क्रिडा खात्याला रमेश तवडकर यांनी लुटले'

गुन्हे केलेले आमदार व उमेदवार भाजपात प्रवेश केल्यानंतर दुधतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात; रमेश तवडकर
Published on

काणकोणच्या राजकारणातून तीन जुन्या राजकारण्यांना निवृत्त करण्यासाठी महादेव देसाई यांना निवडून द्या, असे आवाहन तृणमूल काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आलविता बांदोडकर यांनी आज जाहीर सभेत केले. मल्लिकार्जून देवालयाच्या चावडी येथील जागेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आज पर्यत क्रिडा खात्याला कोणीच लुटले नाही तेवढे रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी क्रिडा मंत्री असताना क्रिडा खात्याला लुटल्याचा आरोप बांदोडकर यांनी केला.

बांदोडकर या क्रिडा (Sports) खात्याच्या स्वेच्छा निवृत्ती स्विकारलेले अधिकारी आहेत. उटा आंदोलनात दोन युवकांचा बळी गेला मात्र या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दोन नेत्यांनी त्या आंदोलनाचे भांडवल करून आमदार व मंत्री पद मिळवले मात्र अनुसूचित जमातीसाठी कोणतेच काम केले नाही. लुसोफोनिया क्रिडा स्पर्धावेळी क्रिडा मंत्र्यांनी अक्षरशः लुट केली एक फुटबॉलची (Football) किमंत 14 ते 15 हजार रूपये, सुवर्ण पदके अवघ्या काळांतच लोह पदके झाली सर्वच भ्रष्टाचार झाला असे त्यांनी सांगितले.

Sports News
'मुरगाव नगरपालिका कामगारांवर भाजपमुळे उपासमारीची वेळ'

यावेळी पक्षाचे उमेदवार महादेव देसाई यांनी भ्रष्टाचारी व गुन्हे केलेले आमदार (MLA) व उमेदवार भाजपात प्रवेश केल्यानंतर दुधतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात अशी या पक्षाची सद्या कार्यपद्धती आहे. नोकऱ्या विकणे हा त्यांचा धंदा झाला आहे अशा पक्षाला उमेदवारांना दूर ठेवा मी निवडून आल्यास मतदाराचा सेवक म्हणूनच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे गांधी हेन्रिक, गावडोंगरीचे माजी सरपंच राजेंद्र वेळीप, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, चंपा पागी, भीमराव गावकर, उल्हास वेळीप यांची भाषणे झाली. यावेळी अशोक पागी, रूपेश देसाई, दिपक पागी उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन लेविन ग्रासियस यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com