पणजी: गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने उसंत घेतली असून ही उसंत अजून आठवडाभर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे. आज काही प्रमाणात ऊन तर काही वेळा दमट वातावरण पाहायला मिळाले.
(Goa Weather Update)
काणकोण, सत्तरी, डिचोली, सांखळी या भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. गेल्या 24 तासात राज्यात एकूण 6.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजतागायत राज्यात एकूण 2004 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जो सरासरी पावसाच्या तुलनेत 11टक्के अधिक आहे. आज पणजी येथे कमाल 30.6 अंश सेल्सिअस तर किमान 24.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करणअयात आली आहे.
पर्जन्यमान
आजचा पाऊस - ६.७ मि.मी.
एकूण पाऊस - २००४ मि.मी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.