Pink Booth: 'पिंक बूथ'ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गुलाबी रंगाचे कपडे घालून पिंक बूथवर महिला वर्गाने बजावला आपला मतदानाचा हक्क
Pink Booth
Pink BoothDainik Gomantak
Published on
Updated on

Pink Booth: आज व्हॅलेंटाइन डे असून विधानसभेचे मतदानही गोव्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महिलांसाठी खास 'पिंक बूथ' तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमाला महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे. महिला वर्गाने गुलाबी रंगाचे कपडे घालून पिंक बूथवर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गोमंतक टीव्हीशी बोलताना काही महिलांनी आपले मत व्यक्त केले. (Spontaneous response of women to Pink Booth)

Pink Booth
आलेमाव भगिनींवर पैसे वाटपाचा आरोप, नावेलीत तणाव

'व्हॅलेंटाइन डे असल्यामुळे आणि गोव्याचे मतदान असल्यामुळे आज आम्ही खूप खुश आहोत. आमच्या भागात म्हणावा तसा विकास झालेला नाही. परंतु आम्ही नव्या उमेदीने आज मतदान करायला आलो आहोत. आता जे नवीन सरकार (Goa Government) गोव्यात येईल त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत,' असे म्हणत महिला वर्गाने मतदानाबद्दल आपला उत्साह व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर नवीन सरकार महिलांसाठी चांगले कार्य करेल असा विश्वास व्यक्त करत, योग्य उमेदवारालाच आपले मत द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com