जनमन उत्सव सर्वेक्षणाला शेल्‍डे पंचायत क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘गोमन्‍तक’ गोव्यातील तीन लाख महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेणार आहे.
Goa Janman Utsav : ‘गोमन्‍तक’ गोव्यातील महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेतली
Goa Janman Utsav : ‘गोमन्‍तक’ गोव्यातील महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेतली Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: महिलांच्या आशा-आकांशा जाणून घेऊन त्यांच्या मतांनुसार गोव्याचा विकास आराखडा तयार करून त्यांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘गोमन्‍तक’ (Gomantak) ने हाती घेतलेल्या जनमन उत्सव सर्वेक्षणाला (Goa Janman Utsav) गोव्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुरगाव मतदारसंघात सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्‍यात काटे-बायणा येथील महिलांनी आपली मते नोंदविली.

Goa Janman Utsav : ‘गोमन्‍तक’ गोव्यातील महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेतली
सांतइस्तेवच्या खून प्रकरणातील 'लाकडी दांडा' पोलिसांच्या ताब्यात..

आतापर्यंत मुरगाव तालुक्यातील दाबोळी, मुरगाव तसेच जवळच्या कुठ्ठाळी मतदारसंघात हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच वास्को मतदारसंघात ते सुरू होणार आहे. या माध्यमातून ‘गोमन्‍तक’ गोव्यातील तीन लाख महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेणार आहे. सध्या दक्षिण गोव्यात कुडतरी आणि कुडचडे मतदारसंघातही हे सर्वेक्षण सुरू आहे. या भागांतूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कुडचडे मतदारसंघातील शेल्‍डे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या चांदेगाळ या वाड्यावर आज सर्वेक्षण करण्यात आले. या भागातील महिलांनी आपली मते नोंदवून त्यात सहभाग घेतला. या महिलांनी ‘गोमन्‍तक’च्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. आतापर्यंत कुडचडे मतदारसंघातील शेळवण व शेल्‍डे या भागात हे सर्वेक्षण झाले आहे. गोव्यातील ४०सही मतदारसंघांत फिरून या सर्वेक्षणाअंतर्गत तब्‍बल तीन लाख महिलांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. यापूर्वी दक्षिण गोव्यात मडगाव, फातोर्डा, नावेली, काणकोण, केपे, दाबोळी व मुरगाव या मतदारसंघांत हे सर्वेक्षण पूर्ण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com