गोव्यातून रामनगरी अयोध्येत दाखल झाली सुपर स्पीड बोट; दसऱ्याला होणार उद्घाटन

या जेट स्टीमरला राम रथ म्हणून ओळखले जाईल.
गोव्यातून रामनगरी अयोध्येत दाखल झाली सुपर स्पीड बोट; दसऱ्याला होणार उद्घाटन
Published on
Updated on

रामनगरी आयोध्याला पर्यटननगरी म्हणून विकसित करण्याचा निर्धार योगी सरकारने केला आहे. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी योगी सरकार अयोध्येत सातत्याने विविध योजना राबवत आहे. जटायू क्रूझ आणि पॅराग्लायडिंगनंतर योगी सरकार आता अयोध्येत सरयूच्या लाटेत जेट स्टीमर, स्पीड बोट आणि पॅरा मोटर बोट सुरू करणार आहे.

आतापर्यंत गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर धावणारी सुपर स्पीड बोट आता शरयू नदीच्या लाटांवर धावताना दिसणार आहे.

अयोध्येला येणारे भाविक आणि पर्यटक या खास बोट राईडचा आनंद घेऊ शकतील. अयोध्येतील गुप्तर घाटावर या बोटीची चाचणी सुरू आहे. दसऱ्याच्या दिवशी या खास बोटीचे उद्घाटन होणार आहे.

या जेट स्टीमरला राम रथ म्हणून ओळखले जाईल. बोटच्या ऑपरेशनसाठी, दोन जेट स्टीमर, तीन स्पीड बोट आणि एक पॅरा मोटर गोव्याहून गुप्तर घाट येथे अयोध्येला पोहोचली आहे. यासाठी गोव्यातील 10 सदस्यांची टीम अयोध्येत दाखल झाली आहे.

बोटचे औपचारिक उद्घाटन 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 'जेट स्टीमर 7500 ते 8000 rpm वेगाने धावेल. सरयूमध्ये कोणतीही दुर्घटना घडली तरी आम्ही कमी वेळात घटनास्थळी पोहोचू शकू. यासोबतच सुरक्षेसाठी रायडरला लाइव्ह जॅकेटची सुविधा देण्यात येणार आहे.'

'अयोध्या विकास प्राधिकरणाने अभितंत्र नावाच्या कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे आता गुप्तर घाटावर सरयूला येणाऱ्या पर्यटकांना जेट स्टीमरचा आनंद लुटता येणार आहे,' असे रायडर साहिल गिल यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com