सासष्टी : पश्र्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेने होळी निमित्त सुरत ते मडगाव दरम्यान खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. 09193 व 09194 या दर आठवड्यातील दोन खास गाड्या खास दरात सुरु करण्यात येणार आहे. 09193 ही सुरत ते मडगाव जंक्शन गाडी 17 मार्चला सुरतहुन संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल व मडगावी दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता पोहचेल.
तसेच मडगाव (Margao) सुरत ही 09194 या क्रमांकाची गाडी मडगावहुन 18 मार्च रोजी दुपारी 1.40 वाजता सुटेल व सुरतला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.35 वाजता पोहचेल. या गाड्या वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळुण, संगमेश्र्वर, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी व करमळी स्थानकांवर थांबेल. या गाड्यांचे आरक्षण 6 मार्च 2022 पासून सर्व पेसेंजर रिझर्वेशन सिस्टम काउंटर्स किंवा आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरु होईल असे कोकण रेल्वेतर्फे (Railways) कळवण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.