Goa Railway News: नाताळानिमित्त मुंबई ते थिवी, पुणे ते करमळी, करमळी ते पनवेल या मार्गावर या जादा गाड्या चालवल्या जाणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी आणि परत या मार्गावर (गाडी क्र. ०११५१, ०११५२) ११ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात ही रेल्वे चालवली जाईल.
मुंबईतून मध्यरात्री 12.20 वाजता ही रेल्वे सुटून दुपारी 2 वाजता थिवी येथे पोचणार आहे. दुपारी 3 वाजता परतीच्या प्रवासाला ही रेल्वे निघेल. पहाटे 3.50 वाजता ती मुंबईला पोचणार आहे. या रेल्वेला पेडणे, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे व दादर येथे थांबे आहेत.
पुणे जंक्शन ते करमळी व परत पुणे. या मार्गावर 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत (गाडी क्र. ०१४४५, ०१४४६) ही रेल्वे चालवली जाईल. दर शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता पुणे जंक्शनहून ही रेल्वे निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमळी येथे पोचणार आहे.
करमळी येथून परतीच्या प्रवासासाठी दर रविवारी ही रेल्वे सकाळी 9.20 वाजता निघून त्याच दिवशी रात्री ११.३५ वाजता पुणे येथे पोचणार आहे. या गाडीला थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, लोणावळा येथे थांबे आहेत.
करमळी ते पनवेल मार्गावर 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान रेल्वे (गाडी क्र. ०१४४८, ०१४४७) चालवली जाईल. करमळी येथून दर शनिवारी सकाळी ९.२० वाजता निघून त्याच रात्री ८.१५ वाजता ती पनवेल येथे पोचणार आहे. पनवेल येथून दर शनिवारी रात्री १० वाजता निघून सकाळी ८.३० वाजता करमळी येथे पोचणार आहे. या रेल्वेला थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड व रोहा येथे थांबे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.