Zilla Panchayat Goa: कामं अर्धवट ठेवणारे कंत्राटदार 'ब्लॅकलिस्ट' होणार! दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा कडक इशारा

South Goa Zilla Panchayat Meeting: जे कंत्राटदार कामे अर्धवट ठेवून पुढील कामे करण्यास विलंब लावतात, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून वेळप्रसंगी त्यांना काळ्या यादीत टाकू
contractors to be blacklisted in Goa
contractors to be blacklisted in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जे कंत्राटदार कामे अर्धवट ठेवून पुढील कामे करण्यास विलंब लावतात, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून वेळप्रसंगी त्यांना काळ्या यादीत टाकू, असा इशारा आज बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत देण्यात आला. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धार्थ गावस  देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

मुख्याधिकारी विकास कांबळे व उपाध्यक्ष अंजली वेळीप व अन्य जिल्हा पंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.  काही कत्रांटदार कामे अर्धवट ठेवून पळ काढतात असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला असता, अध्यक्ष देसाई यांनी त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल असे सांगितले. गोवा पंचायत महिला अभियानाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत डॉ. गौरी शिरोडकर व अन्य पदाधिकऱ्यांचे  अभिनंदन करण्यात आले. निधी वाढवून दिला असला, तरी तो अजूनही हाती पडला नाही, त्याबाबत पाठपुरावा करू, निधी लवकरच मिळेल असे उत्तर अध्यक्ष देसाई यांनी दिले. 

contractors to be blacklisted in Goa
Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

...सामूहिक शेती!

सामूहिक शेती योजना जिल्हा पंचायतींना द्यावी, अशी मागणीही  यावेळी काही जिल्हा पंचायत सदस्यांतर्फे करण्यात आली. अनुसूचित जमातीसाठी अंत्यसंस्कार  योजना सुरु आहे. अन्य समाजाच्या गरीब घटकांसाठी ही योजना लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com