Goa Tourism : दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांकडे ऐन हंगामात पर्यटकांनी केली पाठ

‘मोपा’चा परिणाम : व्यावसायिक हवालदिल अनेकांनी गुंडाळला गाशा
South Goa Beach
South Goa BeachGomantak Digital Team

लक्ष्मीकांत गावणेकर

दक्षिण गोव्यातील किनारी भागात पर्यटन व्यवसायाला मोपा विमानतळामुळे फटका बसला असून दाबोळी विमानतळावर दाखल होणारी अनेक विमाने ‘मोपा’कडे वळविण्यात येत असल्याने आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, अशी करुण कहानी अखिल गोवा शॅक्समालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ फर्नांडिस तसेच इतर व्यावसायिकांनी व्यक्त केली.

देशी-विदेशी पर्यटक नसल्यामुळे भर हंगामात येथे उभारलेले शॅक्स बंद करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, मोपा विमानतळ होण्यापूर्वी दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवर असंख्य पर्यटक दाखल होत होते. दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटक थेट दक्षिण गोव्यात दाखल व्हायचे.

South Goa Beach
Healthy Tips: 'या' पानांवर जेवण केल्यास अनेक गंभीर आजार राहतात दूर

आता ‘दाबोळी’वर येणारी अनेक विमाने मोपा विमानतळावर उतरवली जात आहेत. काही विमान कंपन्या पर्यटकांना मोपा विमानतळावर उतरण्याची सक्ती करतात. अशाने आमचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शॅक काढण्याची वेळ आली, अशी माहिती मोबोर येथील शॅक व्यावसायिक क्रूझ यांनी दिली.

South Goa Beach
Go First Airlines Crisis: आर्थिक दिवाळखोरीत असलेले 'गो फर्स्ट' पुन्हा विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत

हॉटेल व्यवसायालाही लागले मंदीचे ग्रहण

बाणावली येथील एका निवासी हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, गोव्यात दाबोळी विमानतळ सुरू असताना अनेक देशी-विदेशी पर्यटक आपल्या हॉटेलमध्ये येत होते. परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही. कारण मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दक्षिण गोव्यात दाखल होणारे पर्यटक उत्तर गोव्याच्या दिशेने वळले आहेत.

South Goa Beach
'मुख्यमंत्र्यांचा भाऊ, PA सांगणाऱ्या व्यक्तीला बळी पडू नका', मुख्यमंत्री प्रमोद सावंत

चार-पाच वर्षांपूर्वी देशी-विदेशी पर्यटकांची तेजी होती. कोविडमुळे मधली तीन वर्षे वाया गेली. सध्या चार्टर विमाने अल्प प्रमाणात येतात, तीही अधिक प्रमाणात मोपा विमानतळावर दाखल होतात. १५ एप्रिलपर्यंत काही प्रमाणात व्यवसाय चांगला चालला होता. परंतु आता पर्यटक नसल्याने मी माझा शॅक काढला.

इनासियो फर्नांडिस, शॅक व्यावसायिक, बेताळभाटी

South Goa Beach
Jennipher Mistry Controversy : तारक मेहताच्या आधीचा दिग्दर्शक म्हणाला "जेनिफर मिस्त्री ही"...वाचा सविस्तर

पर्यटक येत नसल्याने कोलवा किनाऱ्यावरील माझा शॅक ईस्टर सणापूर्वी काढून टाकला. यापूर्वी चार्टर विमाने दाबोळी विमानतळावर उतरत असल्याने अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे पारंपरिक मासळीच्या भोजनाचा आस्वाद घ्यायला येत. आता पर्यटकच नसल्याने शॅक चालवून काय फायदा?

डायगो डिसिल्वा, शॅक व्यावसायिक, कोलवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com