Sunburn Goa 2024 : डिसेंबरात ‘सनबर्न’ दक्षिण गोव्यात? स्थानिकांचा विरोध
मडगाव, वेगवेगळ्या कारणांसाठी वादग्रस्त ठरलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदा दक्षिण गोव्यात आयोजित करणार, असे या महोत्सवाच्या आयोजकांनी संकेतस्थळावर जाहीर केल्यामुळे दक्षिण गोव्यातील लाेकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
विराेधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उत्तर गोव्यात फाेफावलेली ड्रग्स संस्कृती आता दक्षिण गोव्यात आणण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे.
२८ ते ३० डिसेंबर यादरम्यान हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. मात्र, अजून त्याची जागा निश्चित केलेली नाही.
दक्षिणेवर ‘भाजप’ची वक्रदृष्टी
उत्तर गोव्याचे ड्रग्स आणि गुन्हेगारी स्थळामध्ये रूपांतर केल्यानंतर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी फिरविली आहे. लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे, अशी कोपरखळी युरी आलेमाव यांनी हाणली.
दक्षिण गोव्यातील लोकांपुढे लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सरकार आणखी एक आव्हान उभे करू पाहतेय, असे वाटते. उत्तर गोव्याने नाकारलेला सनबर्न दक्षिण गोव्यातील लोकांवर लादण्याला सर्वांनी विरोध करण्याची गरज आहे. दक्षिण गोवा ही कचरापेटी नाही, हे येथील लोकांनी दाखवायला हवे. ड्रग्ससाठी कुप्रसिद्ध असलेले हे फेस्टिव्हल आम्ही दक्षिण गोव्यात आणू देणार का?
- ॲड. राधाराव ग्रासियस.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.