Goa Police: कोलवा PSI ची महिलेला मारहाण, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची पहिली प्रतिक्रिया

South Police SP: आसगाव प्रकरणावरुन गोवा पोलिस वादात सापडले असताना कोलवा येथील नव्या घटनेमुळे वादंग निर्माण झाला आहे.
कोलवा PSI ची महिलेला मारहाण, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची पहिली प्रतिक्रिया
South Goa SP Sunita SawantDainik Gomantak

तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेला अमानुष मारहाण करुन बूट चाट असे म्हणणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाची मागणी आमदार वेंझी व्हिएगस यांनी केली. याबाबत दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी खुलासा दिला असून, अशी काही घटना घडलीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दक्षिण गोवा पोलिसांच्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणाची आमदार वेंझी व्हिएगस यांनी दिलेल्या माहितीची दखल घेऊन गेल्या तीन ते चार दिवसांतील घटनांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, कोलवा पोलिस स्थनकात असा काही प्रकार घडलाच नसल्याचे तपासातून समोर आले आहे.'

तसेच, 'याप्रकरणी अधिक माहिती असल्यास द्यावी जेणेकरुन योग्य कारवाई करता येईल,' असे दक्षिण गोवा पोलिसांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

कोलवा पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला कोलवा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षकांनी बेदम मारहाण केली एवढेच नव्हे तर त्यांनी महिलेला बूट चाटण्यास सांगितले, असा आरोप बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी वेंझी यांनी केला.

आसगाव प्रकरणावरुन गोवा पोलिसांवर आरोप होत असताना या नव्या प्रकरणाने पोलिस खाते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान, असा काही प्रकार घडला नसल्याचा खुलासा दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com