Railway Expansion Dispute: रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली कंत्राटदारांचा गैरव्यवहार? विरियातो फर्नांडिस आक्रमक, कारवाईची केली मागणी

Railway land acquisition Goa: वेळसांव येथील ज्यांच्या खासगी मालमत्तेचे अतिक्रमण केले आहे, त्या नागरिकांना सध्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यावर खासदार फर्नांडिस यांनी प्रकाश टाकला.
Railway Expansion Dispute
Railway Expansion DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी वेळसाव येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली खासगी मालमत्ता बळजबरीने बळकावल्याचे प्रकरण लोकसभेत उपस्थित केले.

नियम ३७७ चा आधार घेऊन खासदार विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत रेल विकास निगम लिमिटेडच्या कंत्राटदाराकडून स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेचे अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा मांडला.

सरकारी अधिकारी या बेकायदेशीर कृत्याला उघडपणे पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी यावेळी लोकसभेत हा मुद्दा मांडताना नमूद केले.

Railway Expansion Dispute
Goa University: पेपर चोरी प्रकरण! बनावट चाव्या बनवूनच प्रश्नपत्रिकांची चोरी; विद्यापीठाची कबुली; परीक्षा परत होणार का? संभ्रमावस्था

वेळसांव येथील ज्यांच्या खासगी मालमत्तेचे अतिक्रमण केले आहे, त्या नागरिकांना सध्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यावर खासदार फर्नांडिस यांनी प्रकाश टाकला. जे कोण या कृत्यात सामिल आहेत, त्या सर्व रेल विकास निगम लिमिटेडच्या तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत केली आहे.

दरम्यान, वेळसांवसीयांचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल वेळसावच्या ग्रामस्थांनी खासदार विरियातो फर्नांडिस यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com