Loksabha Election 2024 : जिंकण्‍याची क्षमता सिद्ध करावी लागेल; दक्षिण गोव्‍यात भाजप उमेदवारीसाठी चुरस

Loksabha Election 2024 : नवे प्रयोग अंगलट येण्याची भीती; भाजपने या मतदारसंघातून महिला उमेदवारांचाही विचार करण्याचे ठरवल्याने उमेदवारी मिळवण्याची पुरुष इच्छुक उमेदवारांची स्पर्धा तीव्र झाली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024 :

पणजी, दक्षिण गोव्यातून भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. त्यातच उमेदवारीबाबत नवे प्रयोग केल्यास तो प्रयोग अंगलट येण्याची भीती डोकावू लागली आहे.

भाजपकडून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना आता उमेदवारी मिळविण्यासाठी जिंकून येण्याची क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. भाजपने या मतदारसंघातून महिला उमेदवारांचाही विचार करण्याचे ठरवल्याने उमेदवारी मिळवण्याची पुरुष इच्छुक उमेदवारांची स्पर्धा तीव्र झाली आहे.

भाजपच्या नेतृत्वाकडून लोकसभेच्या याच निवडणुकीत महिलांना उमेदवारीत ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न करा, अशी स्पष्ट सूचना आल्याने भाजपने दक्षिण गोव्यातून महिला उमेदवारांचा आजपासून शोध सुरू केला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत या उमेदवारांची नावे प्रदेश निवडणूक समितीसमोर चर्चेला आणण्यासाठी आज पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.

भाजपच्या येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक आणि बाबू कवळेकर हेही सहभागी झाले होते. याशिवाय सभापती रमेश तवडकर, उपाध्यक्ष दत्ता खोलकर, गोविंद पर्वतकर,

खजिनदार संजीव देसाई, आमदार नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी १२ जण सहभागी झाले होते. मंत्री विश्वजीत राणे व माविन गुदिन्हो बाहेरगावी असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

दक्षिण गोव्यात ठरते मतविभागणी महत्त्‍वाची

१ दक्षिण गोव्यातून एकदा रमाकांत आंगले आणि ॲड. नरेंद्र सावईकर यांनीच भाजपसाठी विजय मिळविला आहे. २००९ मध्ये आंगले यांच्या उमेदवारीवेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि आंगले यांच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यात मतविभागणी झाली होती.

२ आता कॉंग्रेस, आप एकत्र आल्याने मतविभागणीची शक्यता नाही. त्यातही सां जुझे दी आरियालमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण सासष्टीतील ख्रिस्ती मते भाजपविरोधात जाण्यास कारणीभूत ठरू शकते.

३ २०१४ च्या निवडणुकीत देशभर नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्यावेळी ॲड. सावईकर जिंकले. तेव्‍हा आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, गोविंद गावडे, चर्चिल आलेमाव आणि आप यांच्यात मतविभागणी झाली होती. २०१९ मध्ये ‘आप’ने २० हजार मते घेऊनही कॉंग्रेसचे फ्रान्‍सिस सार्दिन जिंकले होते.

Loksabha Election 2024
New Zuari Bridge: गोवा सरकारचे 270 कोटींचे कंत्राट मिळाले, कंपनीच्या शेअर्सला होणार फायदा

४ दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाचा प्रश्न सासष्टी, मुरगाव तालुक्यात सत्ताधाऱ्यांसाठी अडचण उभी करणारा ठरणार आहे. १२ भाजपचे, २ अपक्ष आणि १ मगोचा आमदार भाजपच्या बाजूने असूनही भाजपसाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील विजय कष्टमय वाटत आहे.

५ दक्षिणेत कॉंग्रेसचे दोन, ‘आप’चे दोन आमदार आहेत. गोवा फॉंरवर्डचे विजय सरदेसाई कॉंग्रेसला मदत करतील असे दिसते. आलेक्स सिक्वेरा (नुवे), आलेक्स रेजिनाल्ड (कुडतरी), आंतोन वाझ (कुठ्ठाळी) आणि उल्हास नाईक तुयेकर (नावेली) या मतदारसंघात भाजपला फारशी मते मिळणार नाहीत, असा एक अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com