Vishwajit Rane: जिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होणार नाही, दर्जात्मक रुग्णालय बनविण्याचा प्रयत्न; विश्‍वजीत राणे

South Goa District Hospital: पक्ष कोणताही असला तरी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन
South Goa District Hospital: पक्ष कोणताही असला तरी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आवश्‍यक डॉक्टर व इतर कर्मचारी घेण्याबरोबरच इतर सुविधाही देण्यावर आरोग्य खात्याने भर दिला आहे. हे केवळ जिल्हा रुग्णालय राहू शकत नाही, ते गोव्यातील टर्शरी केअर हॉस्पिटल (परिपूर्ण सेवा देणारे रुग्णालय) म्हणून घोषित करावे लागेल. या रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर येत असल्याची स्पष्ट भूमिका मंत्री विश्‍वजीत राणे यांनी मांडली.

मिरामार येथील खासगी कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश बोरकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

राणे म्हणाले, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय तृतीय श्रेणीचे दर्जात्मक रुग्णालय बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण केवळ बोलत नाही, तर ते करून दाखविण्याचीही माझी जबाबदारी आहे.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला खासदार निधीतून दोन रुग्णवाहिका देण्याचे निश्‍चित केले आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दिवसाला ओपीडीमध्ये १ हजार ३०० रुग्ण येतात, ही संख्या गोवा मेडिकल कॉलेजपेक्षा निश्‍चितच जास्त आहे. या रुग्णालयात आयसीयू, सीसीटीव्ही, स्टाफ, पीआरओ, सुरक्षा रक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची फाईल आम्ही पाठविली होती, कारण इंटर्न आता मिळत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून ही सर्व पदे भरले जातील, असेही त्यांनी नमूद केले. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाकडे कसल्याही प्रकारे दुर्लक्ष होणार नाही. पक्ष कोणताही असला तरी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

South Goa District Hospital: पक्ष कोणताही असला तरी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन
Vishwajit Rane: अवैध डोंगर उत्खननावर 25 लाखांपर्यंत दंड ठोठावण्यासाठी कायद्यात सुधारणा

...म्हणून रेफरल हॉस्पिटल राहील!

  १०८ सेवेसाठी २५ रुग्णवाहिका कमी आहेत. पुढील पंधरा दिवसांत सत्तरीत सेवा देणाऱ्या आपल्या ट्रस्टद्वारे २ रुग्णवाहिका प्रदान केल्या जातील. त्याशिवाय १६ रुग्णवाहिका व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून मिळणार आहेत. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून सहकार्य लाभत आहे. त्याशिवाय राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याकडून दोन रुग्णवाहिका मिळणार आहेत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आर्थोपेडिक आणि न्यूरोलॉजी विभाग जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत हे रुग्णालय रेफरल राहील असेही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नमूद केले. या रुग्णालयासाठी एकूण सहा रुग्णवाहिका दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com