Margao News : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा त्रास; लोकांकडून आरोप

Margao News : सरकारी प्रमाणपत्रांसाठी लुबाडणूक
South Goa Collector Office Trouble with Agents
South Goa Collector Office Trouble with AgentsDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News : मडगाव, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सबरजिस्ट्रार कार्यालयाबाहेर काही एजंट कार्यरत असून प्रमाणपत्र तयार करणे व त्यातील दुरुस्ती करणे या कामांसाठी एका प्रमाणपत्रामागे २५० रुपये अकारत आहेत.

हे प्रमाणपत्र लगेच दुसऱ्या दिवशी तातडीने हवे असल्यास चक्क ५०० रुपये घेतले जात आहेत, असा आरोप एका महिलेने केला आहे. रोझी असे या महिलेेचे नाव असून असा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्यांचा हा आरोप अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. तरीही या तक्रारीत काही तथ्‍य आढळल्‍यास संबंधितांवर आम्‍ही कारवाई करू, असे आश्‍वासन सबरजिस्‍ट्रारकडून मिळाले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांनिमित्ताने नागरिक येत असतात.

आपली कामे तत्काळ व्हावीत, अशी आशा सर्वांनाच असते. मात्र, सरकारी काम म्हटल्यावर दहा फेऱ्या माराव्या लागतात. सर्वसामान्य जनतेच्या याच परिस्थितीचा फायदा घेत काही एजंट दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. लोकांची कामे करून देण्याचे आश्वासन देत ते लोकांकडून पैसे उकळत आहेत. आपली कामे लवकर व्हावीत, यासाठी लोकही पैसे देतात.

South Goa Collector Office Trouble with Agents
Goa Highways: गोवा सरकारने रस्त्यांसाठी मागितले 7000 कोटी; केंद्र सरकारने दिले केवळ 110 कोटी रूपये

सबरजिस्ट्रार कार्यालयात प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या रोझी नामक महिलेने एजंटकडून प्रमाणपत्रासाठी फॉर्म भरून देणे व ते मिळवून देण्यासाठी पैसे घेत असल्याचे उघड केले. याबाबत संबंधित एजंटना विचारणा केल्यास त्यांनी आरोप नाकारत केवळ फॉर्म भरण्यासाठी ३० रुपये घेत असल्याचे सांगितले. तसेच कुणाकडूनही पैसे घेत असल्याच्या आरोपांचे खंडन केले.

तत्काळसाठी ५०० रुपये

सबरजिस्ट्रार कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात असलेल्या एजंटला प्रमाणपत्रासाठी २५० रुपये दिले. आपण त्याला १०० रुपये देते, असे सांगितले असता त्यांनी आणखी काहीजणांना पैसे द्यावे लागतात, असे सांगितले.

तसेच तत्काळ दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र हवे असल्यास ५०० रुपये घेत असल्याचेही त्या एजंटने सांगितले, अशी माहिती रोझी या महिलेने दिली. या प्रकारामुळे सरकारी प्रमाणपत्रे िमळविण्यासाठी येणाऱ्या लोकांची लुबाडणूक होत आहे.

कर्मचारी पैसे घेत नाहीत :

सबरजिस्ट्रारमधील अधिकारी सुनील रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या सोयीसाठी सरकारी कर्मचारी कार्यरत असतात. जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसांत दिले जाते. त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणीही कर्मचारी पैसे घेत नाहीत. एजंटांकडून पैसे घेण्याचे प्रकार होत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com