South Goa: दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची उचलबांगडी कारण...

1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश जारी करणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची एका आदेशान्वये बदली करण्यात आली.
South Goa|IAS Jyoti Kumari
South Goa|IAS Jyoti KumariDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa: प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश जारी करणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची एका आदेशान्वये तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आश्विन चंद्रू ए. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काल सायंकाळी उशिरा पर्सनल खात्याचे अव्वल सचिव एहांत सावंत यांनी राज्यपालांच्या वतीने हा आदेश जारी केला.

ज्योती कुमारी यांची सध्या गोवा मनोरंजन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुमारी यांनी प्रजासत्ताक दिनाचा साेहळा साजरा करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांकडून एक हजार रुपयांची वर्गणी गोळा करण्याचा आदेश जारी केला होता.

South Goa|IAS Jyoti Kumari
Goa News: गोवा संशोधन प्रतिष्ठान अध्यक्षांची निवड प्रक्रिया नियमबाह्य

हा आदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर मोठा गदारोळ माजला होता. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना ज्योती कुमारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा 26 रोजी पार पडल्यावर काल तडकाफडकी हा आदेश जारी करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com