Sunburn Festival: दक्षिणेत ‘सनबर्न’ नकोच! व्‍यावसायिकांची भूमिका

Oppose To Sunburn: अंमली पदार्थांच्‍या सेवनामुळे बदनाम झालेले सनबर्न फेस्‍टिव्‍हल कुठल्‍याही परिस्‍थितीत नको
Oppose To Sunburn: अंमली पदार्थांच्‍या सेवनामुळे बदनाम झालेले सनबर्न फेस्‍टिव्‍हल कुठल्‍याही परिस्‍थितीत नको
SunburnDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्‍यातील पर्यटनाला चालना देण्‍यासाठी जर सरकार चांगल्‍या दर्जाचे संगीत महोत्सव आयोजित करत असेल तर आम्‍ही त्‍याचे स्‍वागतच करू, मात्र अंमली पदार्थांच्‍या सेवनामुळे बदनाम झालेले सनबर्न फेस्‍टिव्‍हल कुठल्‍याही परिस्‍थितीत नको, अशी असे मत दक्षिण गोव्‍यातील पर्यटन क्षेत्रातील व्‍यावसायिकांनी व्यक्त केले.

गोव्‍यातील पर्यटनाला चालना देण्‍यासाठी दक्षिण गोव्‍यातही म्युझिक फेस्‍टिव्‍हल आयोजित करावे, अशी मागणी काही व्‍यावसायिकांनी पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्‍याकडे केली होती.

या अशा फेस्‍टिव्‍हलमुळे दक्षिण गोव्‍याचे नावही जागतिक नकाशावर येईल, असा त्‍यांचा दावा होता. मात्र सनबर्न दक्षिणेत आयोजित करण्‍यात येणार असे वृत्त आल्‍यावर त्‍याला सगळीकडून विरोध होऊ लागला आहे.

दक्षिण गोव्‍यातील महत्त्वाचे आदरातिथ्य सेवांचे पर्यटन केंद्र असलेल्‍या केळशी या गावचे सरपंच आणि स्‍वत: हॉटेल व्‍यावसायिक असलेले डिक्‍सन वाझ म्हणाले, दक्षिण गोव्‍यात जर आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव आणि फेस्‍टिव्‍हल आयोजित होत असेल तर आम्‍ही त्‍याचे स्‍वागतच करु. किंबहुना आंतरराष्‍ट्रीय कॉन्‍सर्ट आणि संगीत रजनी आयोजित करण्यासाठी दक्षिण गोव्‍यात कायमस्‍वरुपी केंद्र सुरू केले तर दक्षिण गोव्‍यातील पर्यटनाला त्‍याचा फायदाच होईल.

पण असे जरी असले तरी आम्हांला सनबर्न नको आहे. कारण सनबर्न म्‍हणजे, ड्रग्‍स सेवनाचा महोत्‍सव अशी त्‍याची कुख्‍याती झाली आहे. यामुळेच उत्तर गोव्‍यातून या महोत्‍सवाची हकालपट्टी झाली आहे. अशा महोत्‍सवाचे स्‍वागत करण्‍याची आमची मुळीच इच्‍छा नाही, असे ते म्‍हणाले.

ईडीएम नकोच

वाझ म्‍हणाले, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॉटेल्‍सही पूर्ण भरलेली असतात, अशा परिस्‍थितीत डिसेंबर महिन्‍यात असे फेस्‍टिव्‍हल आयोजित केल्‍यास त्‍याचा स्‍थानिकांना फारसा फायदा नाही. उलट रस्‍त्‍यावरील गर्दी वाढल्याने इतर पर्यटकांसाठी अडचणीची स्‍थिती निर्माण होऊ शकते. यामुळे असे आंतरराष्‍ट्रीय इव्‍हेंट डिसेंबर महिन्‍यात आयोजित करून काहीच फायदा नाही. त्‍यामुळे सनबर्नचाही आम्हांला काही फायदा नाही.

Oppose To Sunburn: अंमली पदार्थांच्‍या सेवनामुळे बदनाम झालेले सनबर्न फेस्‍टिव्‍हल कुठल्‍याही परिस्‍थितीत नको
Sunburn Festival: बेतुल येथेही ‘सनबर्न’चा प्रस्ताव फेटाळला

आम्‍हाला लाभ काय?

१) दक्षिण किनारपट्टीतील अन्‍य एक व्‍यावसायिक जर्सन गोम्‍स यांनीही सनबर्नचा दक्षिण गोव्‍यासाठी काहीच फायदा नाही, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. गोम्‍स यांचे किनारपट्टी भागात स्‍वत:चे हॉटेल आहे. ते म्‍हणाले, सनबर्नसाठी जो प्रेक्षक येतो, तो मुळात गोव्‍यात रहातच नाही. एक तर हा पर्यटक थेट विमानाने किंवा ट्रेनने गोव्‍यात येतो.

२) गोव्‍यात आल्‍यावर रेंट अ बाईक किंवा रेंट अ कार भाड्याने घेऊन सरळ महोत्‍सव स्‍थळी जातो. संपूर्ण रात्र तिथेच काढून सकाळी परतीच्‍या फ्‍लॅटने किंवा ट्रेनने आपल्‍या गावी जातो. उत्तर गोव्‍यातील व्‍यावसायिकांना आत्तापर्यंत मागच्‍या दहा वर्षात हाच अनुभव आला आहे.

३) दक्षिण गोव्‍यात हा महोत्‍सव आयोजित केल्‍यास येथेही तसेच घडेल. त्‍यामुळे सनबर्नचा स्‍थानिक पर्यटक व्‍यावसायिकांना फायदा होईल, यात कसलेही तथ्‍य नाही असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com