Sonsodo: सोनसोडो कचरा समस्या सोडविणे एकट्याची जबाबदारी नाही, अपघातांना मला जबाबदार धरणे अयोग्य; रेजिनाल्ड यांचे स्पष्टीकरण

Aleixo Reginaldo: समस्या सोडविण्यासाठी व त्यावर उपाययोजनेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.
Aleixo reginaldo lourenco
Aleixo reginaldo lourencoDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सोनसोडो कचरा प्रकल्प समस्या सोडविणे ही केवळ आपली एकट्याची जबाबदारी नाही. तरीही ही समस्या सोडविण्यासाठी व त्यावर उपाययोजनेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.

या कचरा प्रकल्पाचा संबंध मडगाव, फातोर्डा व कुडतरी या तीन मतदारसंघाकडे येतो. मंगळवारी पावसामुळे कचरा वाहून आल्याने येथील रस्ता चिखलमय झाला. त्यामुळे काही दुचाकी चालकांना अपघात झाला. यासाठी मला जबाबदार धरण्यात अनेकांनी धन्यता मानली, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

जर या कचरा प्रकल्पासंदर्भातील समस्या सोडवायची असेल तर त्या मागे चांगला हेतू असायला हवा. तिन्ही मतदारसंघांमध्ये समन्वय आवश्यक आहे. या समस्येकडे केवळ राजकारणाच्या किंवा अहंकाराच्या दृष्टिने पाहू नये असे आपले ठाम मत आहे.

Aleixo reginaldo lourenco
Curtorim Water Problem: अनियमित पाणीपुरवठ्याने कुडतरीवासीय हैराण; सर्वंकष लेखापरीक्षण करण्याची मागणी

ही समस्या सोडविण्यासाठी आपला जो प्रयत्न असतो किंवा सहभाग असतो तो यांना दिसत नाही का? मतदारसंघासाठी आपण अहोरात्र झटत आहे. कुडतरी मतदारसंघातील आरोग्य, अपघात, वीज, पाणी पुरवठा, गरिबांना मदत करणे यासारख्या कामांकडे आपण कधी दुर्लक्ष करीत नाही. कुडतरीत आपण पूर्वी कधी कुणीही केली नाहीत त्यापेक्षा जास्त कित्येक विकासकामे पूर्ण केली आहेत. आपल्या विरोधकांना हे पाहवत नाही म्हणून ते जिथे आपला संबंध नाही तिथे जोडतात व काही वाईट घडले तर आपल्याला जबाबदार धरतात. अशा माणसांची आपल्याला किंवा येते असेही रेजिनाल्ड यांचे म्हणणे आहे.

Aleixo reginaldo lourenco
Curtorim: कुडतरी मतदारसंघातील रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण; आलेक्स रेजिनाल्ड

...तेव्हा मी विधानसभेत होतो

पावसामुळे रस्त्यावर निसरड झाली आहे हे आपल्या कळले तेव्हा मी विधानसभेत होतो. तरी सुद्धा आपण लगेच घटनास्थळी आलो व अग्निशमन दलाला फोन करून कामाला लावले, असे लॉरेन्स यांनी सांगितले. आपल्या विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी त्याची आपल्याला पर्वा नाही. कुडतरीतील लोकांना आपल्या व विरोधकामधील फरक माहीत आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com