Sonsodo Garbage issue : सोनसोडोवरील 10 हजार टन कचऱ्याचे स्थलांतर अशक्य

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल : तोडगा काढण्यासाठी खंडपीठाकडून मुदत
Sonsodo Garbage Issue
Sonsodo Garbage IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Madgao : मडगावातील सोनसोडोवर असलेला सुमारे दहा हजार टन कचऱ्याचा ढीग सद्य:स्‍थितीत स्थलांतर करणे अशक्य आहे. मडगाव पालिकेचा प्रत्येक दिवशी १० टन कचरा विल्हेवाटीविना पडून राहत असल्याने त्यात आणखी भर पडत आहे.

त्यामुळे आज संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन उद्यापर्यत त्यावर तोडगा काढण्यासाठीचा निर्णय सादर करण्याचे आश्‍वासन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेवरील सुनावणी उद्या (१२ जुलैला) ठेवली आहे.

गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्‍विन चंद्रू हे आज न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी पाहणीचा प्रथमदर्शनी अहवाल सादर केला. सध्या सोनसोडोवर सुमारे १० हजार टन कचऱ्याचा ढीग आहे. दरदिवशी मडगाव पालिकेचा २५ ते ३५ मे. टन कचरा जमा होतो. त्यापैकी २० टन कचरा हा विल्हेवाटीसाठी साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठविला जातो.

Sonsodo Garbage Issue
Go First Crisis: डीजीसीएचे 'गो फर्स्टला' विमान प्रवाशांचे पैसे परत देण्याचे आदेश

५ मे. टन कचऱ्यावर दक्षिण गोवा पीडीएच्या कचरा विल्हेवाट केंद्रात प्रक्रिया केली जाते तर सुमारे १० टन कचरा हा कोणतीही प्रक्रिया न करता सोनसोडोवर जमा होत आहे. हा कचरा साठून राहत असल्याने मोठी समस्या उद्‍भवली आहे. त्यामुळे जो १० हजार टन कचऱ्याचा ढिग आहे, तो स्थलांतर करणे शक्य नाही असे अहवालात नमूद केले आहे.

Sonsodo Garbage Issue
Goa Crime - जयेश चोडणकर मृत्यूप्रकरणी अखेर खुनाची कबुली; आयआरबी पोलिसाचाही समावेश | Gomantak Tv

अधिकाऱ्याची नियुक्ती करणार; सरकारची माहिती

मडगाव पालिकेकडून २० मे. टन कचऱ्याचे पृथक्करण करून पाठवले जात नसल्याने पूर्ण कचरा स्वीकारला जात नाही. त्यामुळे काही प्रमाणातच कचरा साळगाव येथे पोचत असल्याची माहिती जनहित याचिकादारांच्या वकील नॉर्मा आल्वारीस यांनी खंडपीठाला दिली.

यावेळी न्यायालयाने पालिका या कचरा समस्येबाबत गंभीर नाही किंवा त्या ठिकाणी पालिकेचे अभियंते जातही नसतील असे निरीक्षण नोंदविले. सोनसोडो येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीवर नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल व तो यासंदर्भात निर्णय घेईल अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com