वारंवार आगीच्या घटना तरीही सोनसोडोवर आगरोधक उपाय नाहीत

जिल्हाधिकाऱ्यांकडून मडगाव नगरपालिकेला पुन्हा एकदा तंबी
Sonsodo Fire
Sonsodo Fire Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव नगरपालिकेच्या सोनसोडो कचरा यार्डात दोनदा आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला तेथे आगरोधक उपाय घेण्याची सूचना करुनही पालिकेने कोणतेच उपाय न योजल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला धारेवर धरत तंबी दिली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटिस पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवली आहे.

2019 आणि नंतर 2022 मध्ये अशा दोनदा या घटना घडल्या होत्या. पहिल्या वेळची आग महिनाभर धुमसत होती आणि त्यावेळचे धुराचे लोट व अन्य कारणाने प्रदूषणाची मोठी हानी झाल्याचे कारण सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला 1 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. या कारवाईला मडगाव पालिकेने आव्हानही दिले होते. त्यानंतर यंदा मार्च महिन्यात आगीची दुसरी घटना घडली होती. त्यात सोनसोडोवरील विद्युत यंत्रणा आणि उपकरणे खाक झाली होती.

Sonsodo Fire
राज्यात रेड अलर्ट जारी; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

त्यानंतर सततच्या आगीच्या घटनांची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला विविध उपाय सुचविले होते आणि त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यात सोनसोडोवर आगरोधक उपाय घेणे, पाण्याची टाकी बांधणे, मोटर व अन्य उपकरणे उपलब्ध करणे, त्यासाठी लागणारे कर्मचारी नियुक्त करुन त्यांना प्रशिक्षण देणे, आदी गोष्टींचा समावेश होता. पण पालिकेच्या बाजूने प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याची बाब लक्षात आणून दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ही तंबी दिली आहे. मंडळाच्या सूचनेप्रमाणे पालिकेने तेथे बसवण्यासाठी मोटरपंप आणलेला असला तरी अजून तो बसविलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com