भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. फोगाट यांचा केमिकल आणि सेरोलॉजिकल अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ही नवीन माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्याता आहे.
गोव्याचे पोलिस महानिरिक्षक ओएस बिष्णोई यांनी मात्र माहिती देताना असे सागितले की, सोनाली फोगाट यांचे शव एक महिला पोलिस अधिकाऱ्याने तपासले असता त्यांना कोणतेही गंभीर जखम सापडली नाही. सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्याविरुद्ध सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सोनाली यांचा मृतदेह आज संध्याकाळी दिल्लीला पाठवला जाणार आहे.
फोगाट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी सोनाली फोगाट यांच्या पीए वरती गंभीर आरोप करत तोच दोषी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, फोगाट यांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर आरोपप्रत्यारोप देखील सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी भाष्य करताना फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असल्याची शक्यता आहे. असे म्हटले होते. यावर गोवा फॉरवर्ड पार्टीचे दुर्गादास कामत यांनी शवविच्छेदनाचा दाखला देत मुख्यमंत्री कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल कामत यांनी उपस्थित केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.