Sonali Phogat Case : सोनाली फोगाट केसचा तपास करणारे CBI पथक शुक्रवारी परतले; सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...

Sonali Phogat Case : सोनाली फोगट हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गोव्यात गेलेले सीबीआयचे पथक शुक्रवारी राज्यातून निघाले.
Sonali Phogat Case
Sonali Phogat CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काही दिवसांपासून गोव्यात सोनाली फोगाट हत्याप्रकरण मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणानंतर गोव्यातील गुन्हेगारी आणि ड्रग्सच्या वाढत्या विळख्यावर सरकारचे लक्ष केंद्रित झाले. या केसमधील वळणे लक्षात घेता हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले होते.

सोनाली फोगट हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गोव्यात गेलेले सीबीआयचे पथक शुक्रवारी राज्यातून निघाले. ब्युरोने या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांची कोलवाळ कारागृहात चौकशी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर CBI न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआयने गोवा पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली आहे; तसेच साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. सांगवान आणि सिंग यांनी जामीन अर्ज दाखल केलेला नाही, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Sonali Phogat Case
Goa Petrol-Diesel Price : गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; जाणून घ्या आजचे दर

जिथे सोनाली फोगटला ड्रग्ज दिले गेले होते त्या कर्लिस हाॅटेलमध्ये आणि लिओनी ग्रँड रिसॉर्टमध्ये CBI ने कथितरित्या गुन्हेगारीचे दृश्य देखील पुन्हा तयार केले. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची विनंती आणि खाप महापंचायतीच्या मागणीनंतर राज्य सरकारने फोगट हत्या प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले होते.

23 ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्यापासून या खून प्रकरणाचा तपास करत असलेल्या गोवा पोलिसांना कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता.

सुरुवातीला गोवा पोलिसांनी या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली होती, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तिचा व्हिसेरा सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL), चंदिगड येथे रासायनिक विश्लेषणासाठी पाठवला आणि शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याचे सांगितले.

सांगवन आणि सिंग यांच्यासोबत सोनाली फोगट 22 ऑगस्टला गोव्यात आल्या होत्या. त्यांनी कथितरित्या हॉटेलमध्ये अमली पदार्थ खरेदी केले आणि कर्लिसच्या पार्टीला जाण्यापूर्वी ते यांना दिले होते. CBI लवकरच न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याने ते आता गोव्यातून बाहेर पडणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com