Som Yag Yadnya Festival 2023 Goa
सकारात्मक ऊर्जा निर्मिती, वातावरण शुद्धी, मनशांती आणि आध्यात्मिक समाधानासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अग्निष्टोम महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वकल्याणार्थ आयोजित या यागाचा प्रारंभ उद्या, रविवारी (ता. 5) रोजी सकाळी 5 वाजता होणार आहे. 6 दिवस चालणाऱ्या या यागाची सांगता 10 फेब्रुवारी रोजी सकाळी अवघृत स्नानाने होईल.
दररोज सकाळी सुरू होणाऱ्या या यागाची सांगता दररोज संध्याकाळी 7 पर्यंत होईल. विशेष म्हणजे या यागाच्या परिणामांचे शास्त्रीय कसोटीवर परीक्षण देखील करण्यात येईल.
म्हापशाचे ग्रामपुरोहित सोमयाजी सुहोता दीपक दीक्षित आपटे हे या सोमयागाचे यजमानपद भूषवणार आहेत. सोमयागाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दुपारी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यज्ञस्थळी गजानन महाराजांच्या पादुका
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ) या गुरुपीठवरून परमसद्गुरू श्री गजानन महाराज (शिवपुरी) यांच्या चैतन्य पादुकांचे आगमन यज्ञ स्थळावर होणार आहे.
परमसद्गुरुंनी या गुरुपीठावरून जगाच्या कल्याणासाठी घरोघरी अग्निहोत्राचा संदेश दिला. तोच संदेश घेऊन गुरुपीठावरून चैतन्य पादुकांची पालखी गोव्यात येणार आहे. भाविकांनी या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुपीठाने केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.