तळेबांध जलयुक्त क्षेत्रात माती भराव काम सुरूच

मातीने भरलेले कित्येक ट्रक तेथे आणून खाली करण्यात आले आहेत.
मातीचा भराव टाकताना ट्रक
मातीचा भराव टाकताना ट्रक Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: लोकांच्या विरोधाला न जुमानता तळेबांध येथील जलयुक्त क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम खात्‍यातर्फे पश्र्चिम बगलमार्ग पूर्ण करण्याच्या इराद्याने मातीच्या भरावाचे काम सुरूच ठेवले आहे. मातीने भरलेले कित्येक ट्रक तेथे आणून खाली करण्यात आले आहेत. तेथे शेतजमीन खाली आहे. त्यामुळे रस्ता उंच करण्यासाठी मातीचा भराव

मातीचा भराव टाकताना ट्रक
काणकोणात निनाद पानसेंच मुलांना करियर मार्गदर्शन

आवश्यक आहे. शेतजमिनीच्या मधूनच हा रस्ता तयार होत असल्याने पावसाळ्‍यात तेथे पूर येण्याची भीती लोकांनी व्यक्त करून त्यास विरोध दर्शविला आहे.

राष्‍ट्रीय हरित लवादाने बाकी राहिलेल्या पावणे तीन किलोमीटर रस्ता स्टिल्टवर उभा करावा असा सल्ला दिला असतानाही हे माती भरावाचे काम सुरू आहे. हा रस्ता सुरावली ते मुंगुल या भागात करण्‍यात येत आहे. वेर्णा-नुवे ते घाऊक मासळी मार्केटपर्यंतचा या ११ किलोमीटर अंतराच्‍या पश्र्चिम बगलमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र बाणावली ते सुरावली हा रस्‍ता बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Children’s Act 2003 violation
Merces POCSO court acquittal
Fake call centers in Goa
Sri Lanka Under-19 Cricket Scandal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com