मडगाव रिंग रोडजवळ बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल; समाजसेवकांनी व्यक्त केली चिंता

Margao: गेल्या काही दिवसांपासून कोंबा ते कोलवा दरम्यानच्या मडगाव रिंग रोड जवळील झाडांची बेकायदा कत्तल करण्यात येत असल्याने काही समाजसेवकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Margao Ring Road
Margao Ring Road Dainik Gomantak

Margao: गेल्या काही दिवसांपासून कोंबा ते कोलवा दरम्यानच्या मडगाव रिंग रोड जवळील झाडांची बेकायदा कत्तल करण्यात येत असल्याने काही समाजसेवकांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्या प्रकारे या रस्त्याच्या बाजूची झाडे कापली जातात ती पाहता हे लाकूड माफियांचे कृत्य असल्याचे समाजसेविका झरिना दा कुन्हा यांनी सांगितले. यावेळी किम मिरांडा व क्रायडोन मदेरा हे समाजसेवकही यावेळी उपस्थित होते.

झाडे कापणाऱ्यांना जेव्हा काही प्रश्न विचारले गेले तर त्यांनी तिथून पळ काढला. काही वेळाने एक व्यक्ती तिथे आपत्ती व्यवस्थापन समितीचा आदेश घेऊन आले. त्या आदेशात पावसाळा पूर्व कामांची यादीच होती, असे झरिना दा कुन्हा यांनी सांगितले. या आदेशात केवळ रस्त्यावर अडथळा आणणाऱ्या फांद्या कापण्याचा आदेश आहे. मात्र जी झाडे कापली आहेत ती रस्त्यापासून दूर आहेत व हे काम केवळ फांद्या छाटण्यापुरते मर्यादित नसून पूर्ण झाडच कापले जात आहे. हे काम कोणत्या कंत्राटदाराला दिले आहे व यात लाकूड माफियांचा हात आहे का हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे झरिना दा कुन्हा यांनी सांगितले.

Margao Ring Road
Margao: रमजानचे रोजे लांबले, दररोज एकच खजूर खाऊन जगले; एक 36 तर दुसरा भाऊ 24 तास उपाशी राहिल्याने मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष इथे यावे व झाडे कापण्याच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी क्रायडन मदेरा यांनी केली. येथील झाडे मारली जातात हे पाहून आपल्याला धक्काच बसला असे किम मिरांडा यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू (आयएएस) यांनी या कृत्याची चौकशी करण्याचा आदेश काढावा, अशी मागणी किम यांनी केली. या समाजसेवकांनी ही बाब वन खाते, स्थानिक पोलिस व दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाच्या नजरेस आणून दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com