Margao: रमजानचे रोजे लांबले, दररोज एकच खजूर खाऊन जगले; एक 36 तर दुसरा भाऊ 24 तास उपाशी राहिल्याने मृत्यू

Margao, Goa News: महंमद आणि अफान हे काहीसे धार्मिक वृत्तीचे होते. त्‍यांची आई रुकसाना ही देखील धार्मिक वृत्तीची हाेती.
Margao, Goa
Margao, GoaDainik Gomantak

Margao, Goa News

आके-मडगाव येथील एका फ्‍लॅटमध्‍ये राहणारे महंमद जुबेर खान (२०) आणि अफान खान (२७) या दोघा भावांच्‍या मृत्‍यूबद्दल अजूनही गूढ कायम आहे. धार्मिक प्रथेच्या अतिरेकातून दीर्घकाळ निराहार राहिल्याने त्‍या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

महंमद जुबेर खान हा 36 तास तर अफान खान हा 24 तास उपाशी राहिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

महंमद आणि अफान हे काहीसे धार्मिक वृत्तीचे होते. त्‍यांची आई रुकसाना ही देखील धार्मिक वृत्तीची हाेती. रमजानच्‍यावेळी त्‍यांनी रोजे पाळताना धरलेला उपवास शेवटपर्यंत सोडला नसावा, अशी शंका आता व्‍यक्‍त केली जात आहे. आज या दाेन्‍ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली असता, कित्‍येक दिवस पुरेसे अन्न न घेतल्‍यामुळेच त्‍यांचा मृत्‍यू झाला, असे स्‍पष्‍ट झाले आहे.

बुधवारी त्‍या फ्‍लॅटमध्‍ये या दोघांचे मृतदेह सापडले होते. तर त्‍यांची आई रुकसाना ही अत्‍यवस्‍थ अवस्‍थेत आढळली हाेती. पाहणी केली असता, त्‍यांच्‍या घरात अन्नाचा एकही कण सापडला नव्‍हता. फक्‍त एका डब्‍यात काही मिरच्‍या साठवून ठेवल्‍याचे दिसून आले होते.

यासंबंधी मडगावचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांच्‍याशी संपर्क साधला असता, मृतांची आई रुकसाना हिची तब्‍येत बिघडल्‍यामुळे तिला इस्‍पितळात दाखल केले आहे. त्‍

यामुळे तिची जबानी नोंदवून घेणे पोलिसांना शक्‍य झालेले नाही. तसेच वडील दोन्‍ही पुत्रांच्‍या अंत्‍यसंस्‍कारांच्‍या तयारीत व्‍यस्‍त असल्‍याने त्‍यांचीही चौकशी करता आली नाही. त्‍यामुळे हे दोन्‍ही मृत्‍यू नेमके कसे झाले, ते आम्‍हाला अद्याप कळलेले नाही.

एकच खजूर खाऊन दिवस काढूया!

मृतांपैकी महंमद खान याचे लग्‍न झाले होते. मात्र, त्‍याची पत्‍नीही दुसरीकडे राहायला गेली होती. मिळालेल्‍या माहितीनुसार, तिची सासू रुकसाना ही तिला उपवास करण्‍यासाठी दबाव आणत होती. देवाने फक्‍त एक खजूर खाऊन दिवस काढला.

आम्‍हीही तसेच करायला पाहिजे, असे रुकसाना सुनेला वारंवार सांगत होती, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

Margao, Goa
Traffic Advisory Goa: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

धार्मिक अतिरेकामुळे वडीलही दुरावले

मृतांपैकी महंमद याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते, तर अफान हा कॉमर्स ग्रॅज्‍युएट होता. नोव्‍हेंबरपासून त्‍या कुटुंबाने सर्व लोकांशी संबंध त्‍यागून अलिप्‍त राहणेच पसंद केले होते. नोव्‍हेंबरपूर्वी रुकसाना आणि त्यांची दोन्‍ही मुले सावंतवाडीत राहात होती.

नोव्‍हेंबर महिन्‍यात ते गोव्‍यात आले. मात्र, त्‍यांचा धार्मिक अतिरेक पाहून त्‍यांच्‍या वडिलांनी आकेचा हा फ्‍लॅट सोडून दुसऱ्या ठिकाणी राहणे पसंद केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com