Smriti Irani House In Goa: माजी मंत्री स्‍मृती इराणींनी गोव्‍यातील घर काढले विक्रीस, दावा सांगण्यास 15 दिवसांची मुदत

Smriti Irani House In Goa: मालमत्तेवर कोणाचा दावा असेल तर पंधरा दिवसांत सादर करावा अशी नोटीस जाहीर
Goa News: मालमत्तेवर कोणाचा दावा असेल तर पंधरा दिवसांत सादर करावा अशी नोटीस जाहीर
Smriti IraniDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथे पूजा शर्मा हिने घेतलेल्या ६०० चौरस मीटर जमिनीचा वाद गाजत असतानाच स्मृती झुबिन इराणी यांनी खोर्जुवे-हळदोणे येथील जमीन व घर विक्रीस काढले आहे.

विक्रीपूर्वीचे सोपस्कार म्हणून या मालमत्तेवर कोणाचा दावा असेल तर तो पंधरा दिवसांत सादर करावा, अशी जाहीर नोटीस त्यांनी दिली आहे. खोर्जुवेतील जिमखान्याकडून पुढे जाऊन या मालमत्तेकडे जाता येते.

सर्व्हे क्र. १६०/१४ मध्ये घरक्रमांक ७३ असलेली ३०० चौरस मीटर इमारत आहे. जमीन ८७५ चौ. मी. असून इमारतीला औटहाऊस व विहीर आहे. ‘वन्कासांची, फणसाची मुड्डी’ म्हणून तो भाग ओळखला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com