Smart City : ‘स्मार्ट’ गटारांच्या कामात अनागोंदी; पणजीतील व्हिडिओ व्हायरल

Smart City : विविध प्रकारच्या वाहिन्यांचे जंजाळ न हटवताच गटारांची निर्मिती
Smart City
Smart City Dainik Gomantak

Smart City :

पणजी शहरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यात रस्ते व मलनिस्सारण वाहिनी सुविधा निर्मितीचे काम जोरात सुरू आहे.

येथील डॉन बॉस्को विद्यालयाजवळ तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूच्या गटारांची स्थिती काय आहे, सर्व वाहिन्या एका मार्गातून नेण्यासाठी तयार करण्यात येणारी सुविधा कुठे आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांविषयी सतत आवाज उठविणारे माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्यात डॉन बॉस्को विद्यालयाजवळील तयार केलेल्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटाराला जोडणाऱ्या दुसऱ्या गटारात असलेल्या वाहिन्यांतून पाणी कसे वाहून जाणार असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे पावसच्या पाण्याला गटारातून वाहून जाताना विविध वाहिन्यांचा अडथळा निर्माण होणार असे स्पष्ट दिसते.

एका बाजूला स्मार्ट रस्त्याचे काम करताना सर्व प्रकारच्या विविध वाहिन्या नेणारी रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून सुविधा निर्माण केली आहे. परंतु अशी सुविधा याठिकाणी का केली गेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. मडईकर यांनी स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यापासून त्यावर आक्षेप नोंदवले आहेत. आताही त्यांनी व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल करून स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.

Smart City
Goa Cashew Rates: काजूला 175 रु. भाव ही काँग्रेसचीच मागणी : एल्टन डिकॉस्टा

रस्ता खचला ट्रक रुतला!

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या खालील भाग पोकळ झाला असल्याने ट्रक रुतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास सांतिनेजमधील पु.ना. गाडगीळ सराफी पेढीच्या समोर पणजी महानगरपालिकेचा कचरा वाहू डंपरचे (क्र. जीए०७ टी-००४५) मागील डाव्या बाजूची दोन्ही चाके मातीने भरलेल्या खड्ड्यांत रुतली.

ट्रक रुतल्याची घटना घडताच डंपरवरील चालक आणि कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. गटारांच्या साफसफाईनंतर बाहेर काढलेला कचरा-माती या डंपरमध्ये भरण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com