Goa News: व्यावसायिकांना पुन्हा एकदा संधी द्यावी! बँक कर्जांवरुन 'गोवा चेंबर'चे खासदार तानावडेंना निवेदन

Goa Chamber Of Commerce And Industries: व्यावसायिकांना पुन्हा एकदा व्यवसाय थाटण्याची संधी द्यावी, अशी विनंती गोवा चेंबर ऑफ काॅमर्स आणि इंडस्ट्रीजच्या वतीने राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना करण्यात आली.
Goa Chamber Of Commerce And Industries
Sadananad TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Chamber Of Commerce And Industries Visits Sadananad Tanavade For Loans To Small Businessmens

वास्को: बऱ्याच वर्षांपासून खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे तसेच कोविड काळात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील कित्येक व्यावसायिकांना बँका कर्ज देत नाहीत. अशा व्यावसायिकांना पुन्हा एकदा व्यवसाय थाटण्याची संधी द्यावी, अशी विनंती गोवा चेंबर ऑफ काॅमर्स आणि इंडस्ट्रीजच्या वतीने राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना करण्यात आली.

जीसीसीआयच्या शिष्टमंडळाने तानावडे यांची भेट घेऊन गोव्यातील व्यापार-उद्योगाविषयी चर्चा केली. यात यतीन काकोडकर, चंद्रकांत गावस, संजय आमोणकर, किरण बाळ्ळीकर यांचा समावेश होता.

‘डीजीएफटी’शी संबंधित कामकाज सध्या मुंबईतून हाताळले जात आहे. तसेच मुंबई ऑफिसच्या कामाची व्याप्ती खूपच मोठी असल्यामुळे ते काम पुन्हा गोव्यातून सुरू करावे, अशी विनंती तानावडे यांना करण्यात आली.

तसेच ऑनलाईन सिस्टमवर काम करण्यात पण खूप अडथळे येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे मुरगाव पोर्ट प्राधिकरणावर स्थानिकांना प्रतिनिधित्व मिळावे, तसेच प्रस्तुत कायद्यानुसार विविध उपसमित्या स्थापन कराव्यात, अशी विनंती करण्यात आली.

रामनगर-लोंढा रस्ता दुरुस्त करा!

गोव्यातून बेळगावकडे जाताना रामनगर ते लोंढा हा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा; कारण व्यावसायिकदृष्ट्या वाहतुकीसाठी हा रस्ता खूप उपयुक्त ठरेल, असे निवेदन जीसीसीआयतर्फे तानावडे यांना सादर करण्यात आले. तानावडे यांनी, या सर्व सूचना केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून काही विषय राज्यसभेच्या पटलावरही सादर करू, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.

Goa Chamber Of Commerce And Industries
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

करदात्यांना नोटीस

गोव्यातील कित्येक लोक पोर्तुगीज कायद्याप्रमाणे आयकर विवरण सादर करतात. त्यापैकी अनेकांना आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. काही बदल करताना योग्य ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com