फोंड्याला सहाव्या नगराध्यक्षाचे वेध !

चार वर्षात पाचजणांनी पाहिला कारभार: रितेश नाईक यांची लागणार वर्णी ?
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: फोंड्याला सध्या सहाव्या नगराध्यक्षपदाचे वेध लागले असून नगराध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू आहे. गेल्या चार वर्षात फोंड्याने पाच नगराध्यक्ष पाहिले असून आता उरलेल्या वर्षात आणखी किती बदल होतो. याकडेही लोकांचे लक्ष लागून आहे.23 मे 2018 रोजी सध्याचे पालिका मंडळ कार्यान्वित झाले. पण चार वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच नगरपालिकेत सहावा नगराध्यक्ष पदावर आरुढ होण्याच्या वाटेवर आहे. विधानसभा निवडणुकीत प्रथमच रवी नाईकांनी फोंड्यात कमळ फुलवल्यामुळे भाजप नगरसेवकांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळेच दोनदा हुलकावणी दिलेले नगराध्यक्षपद आता रितेश नाईकांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता हे नगराध्यक्षपद पुढील वर्षभर तरी कायम रहावे, अशी अपेक्षा फोंडावासीय व्यक्त करीत आहेत.

BJP
गोव्यातील 23 न्यायाधीशांच्या बदल्या

या संगीत खुर्चीच्या खेळामुळे फोंड्याच्या विकासाला खीळ बसली असून गेल्या चार वर्षात पालिका क्षेत्रात एकही नवा प्रकल्प सुरू झालेला नाही. एवढेच नव्हे तर 2011 साली तत्कालिन गृहमंत्री रवी नाईक यांनी पायाभरणी केलेला सुवर्णमहोत्सवी प्रकल्प तसाच शीतपेटीत पडून आहे. रवी नाईक गृहमंत्री असताना फोंडा मतदारसंघात तसेच फोंडा शहरात बरेच उपक्रम सुरू झाले होते. मार्केट प्रकल्प हाही त्यांच्या कारकीर्दीत सुरू झालेला प्रकल्प. पण त्यानंतर गेली दहा वर्षे या प्रकल्पात तशी सुधारणा झालेली नाही. मुख्य इमारतीचा वरचा भाग विनावापर बरेच वर्षे पडून आहे. या दरम्यान, दोन पालिका मंडळे आली असली तरी कोणत्याही मंडळाने या प्रकल्पावर म्हणावे तसे लक्ष दिले नाही. आणि यावेळचे पालिकेचे मंडळ तर संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात मश्‍गूल झालेले दिसत आहे.

BJP
Goa Police: ड्रग्‍स, सायबर गुन्‍ह्यांप्रकरणी नवी व्यूहरचना

सध्या रवी नाईक कृषिमंत्री असल्यामुळे रितेश नगराध्यक्ष झाल्यास फोंड्याच्या विकासाला चालना मिळेल व गेल्या चार वर्षात जो विकास झाला नाही तो येत्या वर्षात होईल ,अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे. आता नगरपालिकेच्या निवडणूकीला फक्त एक वर्ष राहिल्यामुळे अनेक इच्छुक तसेच आजीमाजी नगरसेवक बाशिंग बांधून परत एकदा बोहल्यावर चढण्याच्यातयारीत असून त्यांनी आपल्या मतदारांशी संपर्क सुरु करायला सुरुवात केली आहे. हे पाहता नूतन नगराध्यक्ष मिळण्याबरोबरच पुढील वर्षभरात फोंडा नगरपालिका कक्षेत अनेकघडामोडी घडण्याची शक्यता दिसत आहे हे निश्‍चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com