पणजी: युनायटेड ट्रायबल आसोसिएशन अलायंस (उटा) या संघटनेच्या आठपैकी सहा संस्थांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप आणि मंत्री गोविंद गावडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०११ च्या बाळ्ळी आंदोलनात शहीद झालेल्या दिलीप आणि मंगेश यांच्या बलिदानाचे राजकीय भांडवल केल्याचा आरोप प्रकाश वेळीप आणि मंत्री गोविंद गावडे यांच्यावर गोविंद शिरोडकर यांनी केला आहे.
परिषदेत उपस्थित असलेले गोविंद शिरोडकर आणि ॲड. सुरेश पालकर यांनी ‘उटा’च्या आठ संस्थांपैकी सहा संस्था एकत्र असल्याचे सांगितले. ‘उटा’ जे काही करत आहे, त्यात आम्ही सहभागी नाही. त्यामुळे आम्हाला जबाबदार धरू नये, असेही सहा संघटनांनी स्पष्ट केले.
शिरोडकर म्हणाले कि, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, मात्र वेळीप म्हणतात की त्या मान्य झाल्या. विधानसभेत आवाज उठवायला हवा होता पण मंत्री गोविंद गावडे हे आवाज उठवत नाहीत. प्रकाश वेळीप आणि गोविंद गावडे समाजाला तोडण्याचे प्रयत्न करत आहे.
‘उटा’ आठ संस्थांची संघटना आहे, तर आठही संस्थांना बरोबर घेऊन जावे. आम्ही वेळीप यांना पत्र लिहून सात दिवसांत बैठक घेण्याचे आवाहन केले होते, पण अजूनही ती बैठक घेतली गेली नाही. या आठपैकी सहा संघटना आमच्यासोबत आहेत. प्रकाश वेळीप यांनी लोकांची दिशाभूल करू नये.
२००४ मध्ये आम्हाला जे अधिकार मिळायला हवे होते ते मिळाले नाहीत, म्हणून आठ संस्था एकत्र आल्या आणि त्याला ‘उटा’ नाव दिले. आजपर्यंत दोन वर्षे कालावधी सोडला तर प्रकाश वेळीप अध्यक्ष होते. २० वर्षे ते अध्यक्ष होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.