Danielle McLaughlin Trial: 8 वर्षानंतर डॅनियलीला मिळाला न्याय, बहीणीच्या डोळ्यात तरळले अश्रू; गोवा कोर्टाचे मानले आभार

Danielle McLaughlin Murder Case: मागची आठ वर्षे आम्ही न्यायासाठी धडपडत होतो. शेवटी आज तिला न्याय मिळाला. अशा शब्दांत डॅनियलीची बहीण ज्योलिन हिने आज न्यायालयात सर्वांचे आभार मानले.
Danielle McLaughlin Murder Case
Briitish Danielle McLaughlinDainik Gomantak
Published on
Updated on

Danielle McLaughlin Murder Trial

मडगाव:  डॅनियलीला गोवा आवडत होता; पण तिचा शेवटचा गोवा दौरा तिच्यासाठी कमनशिबी ठरला. मागची आठ वर्षे आम्ही न्यायासाठी धडपडत होतो. शेवटी आज तिला न्याय मिळाला. तिला हा न्याय देण्यासाठी ज्या तपास अधिकाऱ्यांनी शिताफीने तपास केला आणि ज्या सरकारी वकिलांनी हा खटला लढविला त्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत डॅनियलीची बहीण ज्योलिन हिने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) न्यायालयात सर्वांचे आभार मानले.

डॅनियलीच्या आत्म्याला न्याय मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा गोवा पाहाण्यास  येण्यास आवडणार आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी  निवाडा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ब्रिटीश व भारतीय वकालात यांचेही आम्ही आभारी आहोत. आमची डॅनियली लोकांना दया व प्रेम दाखविणारी होती. ती सर्वांशी नेहमीच प्रेमाने वागत असे. विकटने  तिला त्रास दिला व तिला आमच्यातून कायमचे हिरावून घेतले, असे डोळ्यांत अश्रू आणत त्यांनी सांगितले.

Danielle McLaughlin Murder Case
Danielle McLaughlin Murder: 'ती'ला समुद्र आवडायचा, होळीसाठी गोव्यात आली; दुसऱ्या दिवशी शेतात नग्नावस्थेत आढळला होता मृतदेह

डॅनियलीचे होते दुहेरी नागरिकत्व

डॅनियली ही ब्रिटीश आणि आयरीश असे दुहेरी नागरिकत्व असणारी युवती होती आणि ती तिच्या ब्रिटीश पासपोर्टवर भारतात आली होती. गोव्यात तिच्या हत्येच्या २ आठवड्यापूर्वी ती भारतात आली होती.

आयर्लंडचे उपपंतप्रधान सायमन हॅरिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘डॅनियलीच्या कुटुंबीयांचे दुःख काहीही झाले तरी कमी करू शकत नसलो तरी, मला आशा आहे की, हा निकाल या कुटुंबासाठी काही प्रमाणात समाधान देईल.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com