Sirf Money : गोमंतकीय कलाकाराकडून ‘सिर्फ मनी’ चित्रपटाची निर्मिती; 4 ऑगस्टला देशभरात होणार प्रदर्शित

सत्यवान नाईक यांचे धाडस; कलाकारांची मांडली व्यथा
Dadasaheb Phalke icon award films organization 2023
Dadasaheb Phalke icon award films organization 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Bollywood Movie Sirf Money : गेली चार दशके ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून संगीत कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या फोंड्यातील अवलियाने चक्क मोठ्या पडद्यावरील हिंदी चित्रपट बनवण्याचे धाडस केले आणि हा चित्रपट पूर्ण करण्यात त्याला यशही मिळाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिर्फ मनी’ असे असून येत्या ४ ऑगस्टला हा चित्रपट भारतभर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट बनवणाऱ्या या अवलियाचे नाव सत्यवान नाईक असे असून ओंकार ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून गोवा व गोव्याबाहेरील संगीत दुनियेत पोचण्याची किमया त्याच्या आवाजाने केली आहे.

Dadasaheb Phalke icon award films organization 2023
Goa Waterfall : चौकशी अहवालानंतरच धबधबे खुले करण्‍यास परवानगी : वनमंत्री विश्‍‍वजीत राणे

फोंड्यात ‘सिर्फ मनी’ या चित्रपटासंबंधी माहिती देताना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अशी भूमिका बजावलेल्या सत्यवान नाईक यांनी आता गोमंतकीय प्रेक्षकांनी आपल्या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.

यावेळी चित्रपटात भूमिका साकारलेले अशोक नाईक उपस्थित होते. विशेष म्हणजे सत्यवान नाईक यांनी दोन संगीत आल्बमही रिलिज केले असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारच्या पर्यटन खात्याला साहाय्यभूत होईल, अशी या आल्बमची निर्मिती आहे.

‘सिर्फ मनी’ चित्रपटाच्या माध्यमातून फिल्मी दुनियेतील वास्तव सत्यवान नाईक यांनी समोर आणले आहे. चित्रपटात काम करण्याची क्रेझ बऱ्याच युवक व युवतींना असते. चित्रपटात काम मिळेल, त्यातून आपल्याला चमकता येईल, अशी अटकळ मनात बांधून विशेषतः ग्रामीण भागातील युवायुवती मुंबई गाठतात, पण बऱ्याचदा त्यांच्या पदरी निराशा येते.

एखाद दुसरा आपल्या नशिबाच्या जोरावर बाजी मारतो, पण प्रामाणिकपणा, सचोटी आणि कलेत तरबेज असलेल्याच्या नशिबी अपयश येते. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संघर्ष करावा लागतो. या संघर्षावरच आधारित हा चित्रपट ‘सिर्फ मनी’ आहे.

Dadasaheb Phalke icon award films organization 2023
Goa Monsoon 2023: गोव्यात ऑरेन्ज अलर्ट, पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ओंकार ऑर्केस्ट्राचे बारा हजार प्रयोग

गेल्या चार दशकांत ओंकार ऑर्केस्ट्राचे गोव्यात आणि गोव्याबाहेर मिळून साधारण बारा हजार प्रयोग झाले आहेत. एकापरीने हा विक्रमच आहे. विशेष म्हणजे गोमंतकीय युवा कलाकारांना घेऊन ओंकार ऑर्केस्ट्राचे प्रयोग करण्यात आले. त्यातून नवनवीन कलाकार घडले.

अजूनही या ऑर्केस्ट्राचे प्रयोग सुरू आहेत. या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातूनच मुंबईतील चित्रपट कलाकार, निर्मात्यांकडे सत्यवानची ओळख झाली आणि सिर्फ मनीची संकल्पना रूजली असे यावेळी सांगण्यात आले.

दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार...

सत्यवान नाईक यांना आठ दिवसांपूर्वी मुंबई झालेल्या एका शानदार कार्यक्रमात दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आदी उपस्थित होते. हा पुरस्कार म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे माध्यम आहे आणि अशाप्रकारचा पुरस्कार गोव्यात यापूर्वी कुणालाही मिळालेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com