Siolim: शिवोली आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा! नागरिकांत तीव्र संताप; अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

Siolim Hospital: सहा महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजात नुतनीकरण करण्यात आलेल्या शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.
Siolim Hospital
Siolim HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: सहा महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजात नुतनीकरण करण्यात आलेल्या शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून औषधे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, त्यातून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिवोली येथील इंग्रजवाडा परिसरात कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून नुतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आले होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी आवश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

या आरोग्य केंद्रात सध्या बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभाग, प्रसूती विभागासह इतर महत्त्वाचे विभाग कार्यरत आहेत. पेडणे तालुक्यातील केरी-हरमलपासून बार्देशमधील गिरी, वेर्ला–काणका, हणजुण–वागातोर तसेच शिवोली पंचक्रोशीतील सडयें ते ओशेलपर्यंतच्या शेकडो ग्रामस्थ या केंद्रावर अवलंबून आहेत.

मात्र गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तीव्र तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना औषधांशिवाय परत जावे लागत आहे. त्यामुळे औषध विभागातील कर्मचाऱ्यांशी वादावादी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. दरम्यान, यासंदर्भात शिवोली आरोग्य केंद्राच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत हात वर केले.

Siolim Hospital
GMC: ‘गोमेकॉ’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी! 4 IMA MSN सन्मान मिळवणारे ठरले पहिले महाविद्यालय

वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार सुरू असून, सध्या अधिक बोलता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औषधांच्या अभावामुळे रुग्णांची कुचंबणा होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. औषध विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर मौन बाळगणेच पसंत केले.

Siolim Hospital
Goa Child Health: गोव्यातील बालकांचे आरोग्य धोक्यात, कुपोषण आणि वाढ खुंटल्याने वाढली चिंता; मुलांमध्‍ये फोफावतोय ‘ॲनिमिया’

“आमची औषधांसाठी होणारी परवड थांबली पाहिजे. माझ्यासह इतरही अनेक रुग्णांना औषधांअभावी परत जावे लागत आहे. सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे.”

- एकनाथ गोवेकर, ज्येष्ठ नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com