Siolim: मासेविक्री करणाऱ्या 'परप्रांतीय' कामगारांची नोंदणी करा! मार्ना -शिवोली ग्रामसभेत मागणी

Siolim Gramsabha: स्थानिक ज्योकीम बार्रुस यांनी तारची-भाट परिसरातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली असल्याचे पंचायत मंडळाच्या लक्षात आणून दिले.
Siolim Panchayat
Siolim GramsabhaDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: मार्ना -शिवोली ग्रामसभेत रोजंदारीवर काम करणारे परप्रांतीय मजूर शिवोलीत भाड्याच्या घरात राहतात. ते दिवसभर बाजारात ठाण मांडून पिचकाऱ्या मारत बसतात. अशा लोकांसाठी नियंत्रण ठेवण्यासाठी मासेविक्री करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे द्यावी. तसेच ते मनमानेल तशी मजुरी घेतात. त्यांच्या मजुरीचे दर निश्‍चित करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

व्यासपीठावर सरपंच अमीत मोरजकर, पंच सदस्य संदेश हडफडकर, विलियम फर्नांडिस, अभय शिरोडकर, महिला पंच सदस्यां शर्मीला वेर्णेकर तसेच सिंपल धारगळकर तसेच पंचायत सचिव प्रेमानंद पार्सेकर उपस्थित होते.

राय-शिवोली प्रभागात रहिवासी प्रकल्पावरून गाजली. पंचायत सचिवांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित प्रकल्पाबाबत सभेत चर्चा करणे न्यायालयाचा अवमान ठरत असल्याचे सांगून त्यांवर चर्चा करण्याचे टाळले. यावेळी पंचायत मंडळ व राय-ग्रामस्थ संतप्त झाले.

Siolim Panchayat
Siolim Accident: शिवोलीत अचानक गाय आडवी आल्यामुळे पर्यटकाची कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

स्थानिक ज्योकीम बार्रुस यांनी तारची-भाट परिसरातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली असल्याचे पंचायत मंडळाच्या लक्षात आणून दिले. पावसाळ्यात येथील स्थानिक लोकांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या समस्येवर ठोस उपाययोजना आखण्याची मागणी केली.

Siolim Panchayat
Siolim Accident: शिवोलीत अचानक गाय आडवी आल्यामुळे पर्यटकाची कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

भाडेकरूंची तपासणी करा

मार्ना -शिवोली येथील धोकादायक चढावावर पंचायत मंडळाला विश्वासात न घेता तसेच स्थानिक कोमुनिदादच्या जागेत अतिक्रमण करून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे, याबाबतीत ठोस माहिती लोकांना देण्याची मागणी फातिमा फर्नांडिस या स्थानिक महिलेकडून करण्यात आली. भाडोत्री लोकांचे सर्वेक्षण तसेच पोलिस तपासणी दर महिन्याला करावी, जेणेकरून स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, असा ठराव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com