Siolim Oshal: 'ओशेल झरा' बांधकाम प्रकरणी गोवा खंडपीठाकडून नोटिस! पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरला

Goa Bench: शिवोली येथील ओशेल झऱ्याच्या परिसरात बांधकाम केलेल्या बहुनिवासी प्रकल्पाच्या सांडपाणी निचरा टाक्यांमुळे होणारे दूषित व अपरिवर्तनीय नुकसानीबाबत गोवा खंडपीठात जनहित सादर केली आहे.
Goa Bench: शिवोली येथील ओशेल झऱ्याच्या परिसरात बांधकाम केलेल्या बहुनिवासी प्रकल्पाच्या सांडपाणी निचरा टाक्यांमुळे होणारे दूषित व अपरिवर्तनीय नुकसानीबाबत गोवा खंडपीठात जनहित सादर केली आहे.
Siolim Oshal NewsGomantak Digital Team
Published on
Updated on

Siolim Oshal Stream Construction Goa Bench Notice

पणजी: शिवोली येथील ओशेल झऱ्याच्या परिसरात बांधकाम केलेल्या बहुनिवासी प्रकल्पाच्या सांडपाणी निचरा टाक्यांमुळे होणारे दूषित व अपरिवर्तनीय नुकसानीबाबत ओशेलवासियांतर्फे सूरज चोडणकर व आवेर्तान मिरांडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित सादर केली आहे. प्राथमिक सुनावणीवेळी आज गोवा खंडपीठाने सरकारसह इतर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावून पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरला ठेवली आहे.

या जनहित याचिकेत सरकार, नगर व शहर नियोजन खाते, जलस्रोत खाते व ओशेल पंचायत, मे. रारा एक्स्पोर्टस् प्रा. लि., विन्ती साहनी, मे. जय संतोषी हाउसिंग प्रा. लि. यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ओशेल गावातील सर्वे क्रमांक ५१/२१ मध्ये सध्या आठ बंगले व जलतरणाचे काम सुरू आहे. या भागात जवळच ओशेल झरा आहे. त्यामुळे तेथील बहुनिवासी प्रकल्पामुळे तेथील सांडपाणी निचरा होऊन ते या झऱ्यामध्ये पोहचू शकते व हा झरा सुमारे ३५० वर्षापूर्वीचा आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

२१९ रहिवाशांचे निवेदन

हा कथित बेकायदेशीर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात येतो म्हणून सर्व बांधकामे त्वरित थांबवावी आणि जमीन जमीनदोस्त करून मूळ स्थितीत आणण्याची मागणी सुमारे २१९ ओशेल रहिवाशांनी यापूर्वी ओशेल पंचायत, जलसंपदा विभाग, पीडब्ल्यूडी, उपनगर नियोजक, म्हापसा, मुख्य नगररचनाकार यांना अनेक लेखी निवेदने दिली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

Goa Bench: शिवोली येथील ओशेल झऱ्याच्या परिसरात बांधकाम केलेल्या बहुनिवासी प्रकल्पाच्या सांडपाणी निचरा टाक्यांमुळे होणारे दूषित व अपरिवर्तनीय नुकसानीबाबत गोवा खंडपीठात जनहित सादर केली आहे.
Siolim Health Centre: छताला गळती, धोकादायक भिंती, परिसरात दुर्गंधी; शिवोली आरोग्य केंद्रचं 'आजारी'

पंचायतीकडून कारवाई नाही

ओशेल पंचायतीच्या सरपंचाने ‘सेव्ह ओशेल स्प्रिंग’च्या निषेध मेळाव्यात उघडपणे जाहीर केले होते की, बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली जाईल. बहुनिवासी प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मागे घेण्यात येतील आणि रस्त्याची रुंदीची तपासणी देखील केली जाईल मात्र त्यानंतर दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे ही जनहित याचिका सादर करावी लागल्याचे त्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa bench Fire Case
Goa High Court Minor Child
Goa High Court Double Murder Acquittal
Chimbel Illegal Borewells
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com