Siolim Mango : शिवोलीचा ‘मानकुराद’ चविष्ट ; लाखोंची उलाढाल

Siolim Mango : मानकुराद आंब्यापाठोपाठ हापूस, मांगेलाल, मुशाराद जातीच्या आंब्यांनाही या भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते व चतुर्थीपर्यंत काही जातीचे आंबे शिवोली तसेच जवळच्या ओशेल गावात विक्रीस उपलब्ध असतात.
Siolim  Mango
Siolim MangoDainik Gomantak

संतोष गोवेकर

Siolim Mango :

शिवोली, आंब्यांच्या जातींमध्ये ‘मानकुराद’ आंबा हा गोव्यात सर्वश्रेष्ठ असा मानला जातो. बार्देशातील शिवोली गावात ‘मानकुराद’चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

येथील माती यासाठी पोषक आहे. शिवोलीत जागोजागी मानकुराद आंबा विक्रीसाठी उपलब्ध असतो. येथील ‘मानकुराद’ गोव्याची शान आहे.

मानकुराद आंब्यापाठोपाठ हापूस, मांगेलाल, मुशाराद जातीच्या आंब्यांनाही या भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते व चतुर्थीपर्यंत काही जातीचे आंबे शिवोली तसेच जवळच्या ओशेल गावात विक्रीस उपलब्ध असतात. या काळात आंबा विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या भागातील धारगळकर तसेच बाणावलीकर आडनावाच्या लोकांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या आंब्यांचे पीक घेतले जाते व यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा तसेच कामगार वर्ग वापरात आणावा लागतो.

दर आठवड्याला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने घरगुती पद्धतीने गवताचा आधार घेत पारंपरिक पिकविण्यात आलेले आंबे नंतर म्हापसा तसेच पणजी शहरांत विक्रीसाठी पुरवले जातात. लोकांकडून विशेषकरून शिवोलीच्या मानकुरादला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Siolim  Mango
Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

हंगाम अंतिम टप्प्यात

सुरवातीला आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील लोकांसाठी मानकुराद खरेदी करणे खूप महाग होत असल्याने याकाळात हापूस आंब्यांची विक्री तेजीत दिसून येते. जानेवारीत दीड ते दोन हजारांहून अधिक किंमत असलेला शिवोलीचा डझनभर ‘मानकुराद’ जूनपर्यंत पाचशे ते सातशे रुपये डझनवर येऊन थांबतो. सध्या ‘मानकुराद’चा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून दरातही घट होत आहे.

आंब्यांचा व्यवसाय करताना या कामात मेहनतीबरोबरच मोठ्या प्रमाणात खिशातील पैसाही ओतावा लागतो. सुक्या गवताचा आधार घेत पारंपरिक पद्धतीने आंबे पिकविण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सरकारने याबाबतीत स्थानिक आंबा व्यावसायिकांना सढळ हस्ते आर्थिक मदत केल्यास स्थानिक तरुणवर्ग या व्यवसायाकडे ओढला जाईल आणि मानकुराद गोव्याची शान अजूनच वाढवेल यात शंका नाही.

- राजेश धारगळकर, आंबा व्यावसायिक,शिवोली

Siolim  Mango
Goa Top News: मुख्यमंत्र्यांची बैठक, राज्यातील शाळा, श्रेया धारगळकर प्रकरण; गोव्यातील ठळक बातम्या

सरकारकडून विशेष योजना राबविणे गरजेचे

१ दरवर्षी मानकुराद तसेच इतर जातींच्या आंब्यांचे पीक घेताना प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यावसायिकास तीन लाख ते दहा लाखांपर्यंत खर्च येतो. सर्वांनाच ही आर्थिक उलाढाल शक्य होत नसल्याने अनेकजण या व्यवसायातून माघार घेत असल्याचे दिसून येते.

२ शिवोलीचाच विचार केल्यास पाच टक्क्यांहूनही कमी व्यावसायिक सध्या या व्यवसायात दिसतात. सरकारने राज्यातील हा आंबा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी विशेष योजना राबविण्याची गरज आहे, असे आंबा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

३ आंबा हंगामाच्या शेवटपर्यंत पन्नास हजारांपासून लाखभर रुपये तरी नफ्याच्या रूपात व्यावसायिकाच्या खिशात पडतात; परंतु ‌या सगळ्या गोष्टी व्यवसायातील पीक उत्पादन तसेच विक्रीवर अवलंबून असतात, हेही तितकेच खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com