Court
Court Dainik Gomantak

Siolim Shootout Case: शिवोलीत हॉटेलमध्ये गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जेम्स डिसुझाला सशर्थ जामिन

बार्देश तालुक्यातून हद्दपार
Published on

Siolim Shootout Case: शिवोलीमधील हॉटेलमध्ये गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जेम्स डिसुझा याला न्यायालयाने सशर्थ जामिन मंजूर केला आहे. तथापि, डिसुझा याला बार्देश तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याला बार्देश तालुक्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

या काळात जर तो बार्देश तालुक्यात दिसून आला तर त्याच्यावर पुन्हा अटकेची कारवाई होऊ शकते.

Court
Goa Employment News: रोजगार देण्याबाबतचा गोवा सरकारचा दावा पोकळ

या गोळीबार प्रकरणी न्यायालयाने जेम्स डिसुझा, मोहम्मद मनियार, सूरज सिंग, लक्ष्मण हरिजन या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती झेन कार क्रमांक GA-01-S-2608 ही गाडीही जप्त केली होती.

वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये संशयित आरोपींचा चार-पाच जणांचा गट आला होता. संशयित रेस्टॉरन्टच्या बार काऊंटरसमोर उभे राहिल्याने रेस्टॉरन्ट चालक अक्षद शेट्ये यांनी त्यांना बाजूला राहण्याची सूचना केली.

त्यावरुन संशयितांनी त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. यावेळी त्याच्यातील संशयित जेम्स डिसुझा याने त्याच्याकडील पिस्तूल काढले व रेस्टॉरन्ट चालकावर गोळी झाडली.

यात सुदैवाने रेस्टॉरन्ट चालक बचावले. तसेच संशयिताने रेस्टॉरन्ट चालक व कामगारांना धमकी दिली. रेस्टॉरंट मालकाने या घटनेबाबत हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com