Siolim News : गुंडगिरी खपवून घेणार नाही : दिलायला लोबो

Siolim News : पीडित आगरवाडेकर कुटुंबासमवेत घेतली पोलिसांची भेट
Siolim
Siolim Dainik Gomantak

Siolim News :

शिवोली, आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे राहते घर ‘भाटकार’ पिंटो व दिल्लीस्थित पूजा शर्मा यांनी बाऊन्सर्सच्या मदतीने काल जमीनदोस्त केले होते.

या पार्श्वभूमीवर शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी आज रविवारी हणजूण पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्‍यांच्‍याशी चर्चा केली. शिवोलीत कुठल्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी आमदार लोबो यांच्‍यासमवेत प्रदीप आगरवाडेकर, त्यांची पत्नी, मुले तसेच आसगावचे सरपंच हनुमंत नाईक उपस्थित होते. पूजा शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या तीस ते चाळीस परप्रांतीय बाऊन्सर्सनी दमदाटी करून ज्या पद्धतीने त्यांचे घर पाडले याचा आगरवाडेकर कुटुंबीयांनी हणजूण पोलिसांसमोर पाढा वाचला. आता आगरवाडेकर पिता-पुत्र अपहरणाची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Siolim
Haihaya King Ruled Goa: ऐतिहासिक गोव्यावर होती हैहय राजघराण्याची सत्ता; नवी माहिती प्रकाशात

या घटनेने मन सुन्न झाले आहे. भरवस्तीत सर्वांच्या डोळ्यांदेखत एक परप्रांतीय महिला बाऊन्सर्सच्या मदतीने आगरवाडेकर यांचे घर जमीनदोस्त करते ही गोष्टच मनाला पटणारी नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे हे उदाहरण आहे‌. अशा गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही. हणजूण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- दिलायला लोबो, आमदार

आगरवाडेकर कुटुंबीयांना गावातील प्रत्येक माणूस ओळखतो. ते राहत असलेले एकमजली घर मूळ ख्रिस पिंटो यांच्या मालकीचे असले तरी त्या घराचा कायदेशीर ताबा मिळविण्यासाठी आगरवाडेकर कुटुंबीयांकडून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आलेले आहेत. घरपट्टी आगरवाडेकर यांच्या नावानेच भरली जात आहे.

- हनुमंत नाईक, सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com