

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेल्या गौतम खट्टरने राज्यातील पत्रकारांबाबतही मुक्ताफळे उधळली. या घटनेबाबत प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी त्याचा जाहीर निषेध केला. अशा व्यक्ती गोव्यात येऊन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे गोमंतकीय जनतेने त्यांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी रविवारी पणजीतील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.
‘जगात देव एकच आहे. परंतु, त्याची नावे वेगवेगळी आहेत. गोवा ही अनेक देव–देवतांची भूमी आहे. धार्मिक सलोख्याबाबत गोवा जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, काही व्यक्ती इतर प्रांतांतून गोव्यात येऊन देव–देवतांबाबत आक्षेपार्ह विधाने करीत राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत. अशांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
‘गोव्यातील अनेक हिंदूंनी ख्रिस्ती धर्मांतरण केले. त्यामुळे ख्रिश्चनही मूळचे हिंदूच आहेत. त्यांच्यात हिंदूंचेच रक्त आहे. याचे भान बाहेरून गोव्यात येणाऱ्यांनी ठेवले पाहिजे. पूर्वजांना दुखावणे हे हिंदुत्व नव्हे’, असेही सरदेसाई म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.