Goa Politics: वर्चस्‍व प्रस्‍थापित करण्‍यासाठी भाजपचा प्रयत्‍न

Goa Politics: डिचोली तालुका : मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट, चंद्रकांत शेट्ये यांची भूमिका महत्त्‍वपूर्ण
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे ‘भाऊ’ अर्थातच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हेच यावेळी भाजपचे उमेदवार असतील असा राजकीय अंदाज आणि तशी चर्चाही सुरू आहे. तरी देखील उमेदवारीबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.

उमेदवार म्हणून श्रीपाद नाईक पुन्हा मतदारांसमोर येणार की यावेळी उमेदवार बदलणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीसुद्धा उमेदवार कोणीही असो, डिचोली तालुक्यातील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याची भाजपला अधिक संधी आहे.

डिचोली तालुक्यात डिचोलीसह साखळी आणि मये विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पैकी साखळी मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत व ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूने डिचोली तालुक्यातील बहुतांश गाव खाणपट्ट्यात येतात. त्यामुळे खाणपट्ट्यातील लोक आणि खाण कामगारांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार असली तरी त्याचा भाजपच्या वर्चस्वाला मोठासा तडा बसणार नसल्याचा अंदाज आहे.

२००७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून डिचोली तालुक्यात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. २००७ आणि २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर तालुक्यातील

डिचोलीसह साखळी आणि मये मिळून तिन्ही मतदारसंघांवर भाजपने आपला झेंडा फडकावला होता. तर, २०१२ आणि २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त डिचोली मतदारसंघात भाजपची काहीशी पीछेहाट होताना अपक्ष उमेदवारांची सरशी झाली.

२००९, २०१४ आणि २०१९ साली मिळून गेल्या सलग तीन लोकसभा निवडणुकीत तर डिचोली तालुक्यात भाजप उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली. तिन्ही वेळा भाजपचे श्रीपाद नाईक यांच्या विजयात डिचोली तालुक्याने मोठा वाटा उचला आहे.

Goa BJP
Russian booked in Goa: हरमल येथे नाईट कँपमध्ये 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; रशियन नागरिकाविरोधात गुन्हा

मये मतदारसंघ हा भाजपचा ‘गड’ म्हणून ओळखण्यात येतो. गेल्या सलग चार विधानसभा निवडणुकांत आतापर्यंत या मतदारसंघात भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. २०१७ आणि २०२२ साली सत्ताधारी आमदारांना उमेदवारी डावलूनही भाजपच्या वर्चस्वावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

२०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रेमेंद्र शेट ३ हजार १३६ मतांची आघाडी मिळवून निवडून आले. त्यांना ७ हजार ८७४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे संतोषकुमार सावंत यांना ४ हजार ७३८ मते मिळाली होती.

Goa BJP
Goa And World Bank MoU: 1650 कोटींच्या हवामान निधीसाठी गोव्याचा करार

डिचोलीत तिसरे स्‍थान, तरीही वर्चस्‍व!

२०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत डिचोली मतदारसंघातून भाजपची पीछेहाट होताना अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची सरशी झाली. निवडून येताच शेट्ये यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला तरी दुसऱ्या बाजूने अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यामुळे भाजपची पत टिकून राहिली. या निवडणुकीत डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना ९ हजार ६०८ व प्रतिस्पर्धी उमेदवार मगोचे नरेश सावळ यांना ९ हजार २९० मते मिळाली. भाजपचे राजेश पाटणेकर हे तिसऱ्या स्‍थानी फेकले गेले. त्‍यांना ५ हजार १४१ मतांवर समाधान मानावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com