रांगोळीमुळे सकरात्मक ऊर्जा तयार होत असल्याने रांगोळी कलेचे संवर्धन होणे आवश्यक आहे. रांगोळी कलाकारांनी आपली कला इतरांनाही शिकवावी, जेणेकरून कलेचा प्रसार होण्यास मदत होईल असे प्रतिपादन गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी येथे केले.
वास्को द गामा रोटरेक्ट क्लब व वास्को द गामा सम्राट क्लब यांनी वास्को सप्ताहाचे औचित्य साधन 'अवघा रंग एक झाला' या शिर्षकाखाली रांगोळी चित्रांचे प्रदर्शन आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बांदेकर बोलत होते. रांगोळी कलाकार आकाश नाईक याने सुमारे चोवीस तास परिश्रम करून 25 चौरसमीटर क्षेत्रफळात श्री देव दामोदर व वास्को सप्ताहातील क्षणचित्रांची रांगोळी रेखाटली आहे.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सम्राट क्लबचे अध्यक्ष जयराम पेडणेकर, रोटरॅक्ट कल्चच्या अध्यक्ष प्रियांका पंडित, प्रकल्प अधिकारी रोहन बांदकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रांगोळी प्रदर्शन फक्त वास्को सप्ताहप्रसंगी न भरविता कोणत्या ना कोणत्या सणांचे औचित्य साधून रांगोळीची कला नागरिकांसमोर सादर करावी, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले. जयराम पेडणेकर यांनी स्वागत केले. प्रियांका पंडित हिने क्लबच्या कार्याची माहिती दिली. रोहन वांदेकर याने सदर उपक्रमासंबंधी माहिती दिली. अपेक्षा बांदेकर हिने पाहुण्यांचा परिचय करून दिली. आकाश नाईक व सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. देवेंद्र शिरोडकर याने भक्तीगीत गायले.
आजकाल बहुतांश मोबाईलच्या आहारी गेले आहेत. लहान मुलांनी स्क्रिन अॅडिक्टेट' होऊ नये यासाठी त्यांना ठिपक्यांच्या रांगोळीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन डॉ. बांदेकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.