'Silly Souls' रेस्टॉरंटप्रकरणी आज सुनावणी!

अबकारी आयुक्तांसमोर सुरू असलेली सुनावणी आज पुढे सुरू होणार आहे.
Silly Souls Bar And Restaurant
Silly Souls Bar And RestaurantDainik Gomantak
Published on
Updated on

Assagao: देशभरात चर्चेत आलेल्या आसगाव येथील 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' (Silly Souls Bar And Restaurant) प्रकरणावरील अबकारी आयुक्तांसमोर सुरू असलेली सुनावणी आज पुढे सुरू होणार आहे. हे रेस्टॉरंट चालवण्यासाठी घेण्यात आलेला परवाना बेकायदेशीर पद्धतीने तसेच एका मृत व्यक्तीच्या नावावर त्याचे नुतनीकरण केले आहे असा दावा तक्रारदार ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

या प्रकरणाच्या सुरुवातीला केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कुटुंबीयांमार्फत हे रेस्टॉरंट चालविले जात असल्याचे तसेच बेकायदेशीपणे त्याचा विस्तार केला असल्याचे उघडकीस आल्यावर त्यांनी त्याला विरोध केला होता. या रेस्टॉरंटशी त्यांच्या कुटुंबीयांचा संबंध नसल्याचा दावा केला होता.

Silly Souls Bar And Restaurant
चाहते गहिवरले! Sonali Phogat चा शेवटचा चित्रपट लवकरच होणार रिलीज

मात्र, रॉड्रिग्ज यांनी एकामागोमाग एक माहिती हक्क कायद्याखाली या रेस्टॉरंटसंबंधित दस्तावेज जमा केल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली आहे. काही दिवसांपूर्वी रॉड्रिग्ज यांनी या रेस्टॉरंटसाठीचे अन्न आणि औषध प्रशासनाचे एफडीआय (FDI) परवाने स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांच्या इटटोल फूड अँड बेव्हरेजेस एलएलपी आणि उग्रया मर्कन्टाई प्रा. लि. च्या संलग्न भागिदारीतील कंपनीच्या नावावर असल्याचा पर्दाफाश केल्यानंतर केंद्रीयमंत्री या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com