'तो' जिद्दीने पोहला, पण लाटांच्या तडाख्यापुढे हरला; मासेमारीसाठी गेलेल्या खलाशाचा सिकेरीत बुडून मृत्यू

Nerul fisherman death: सिकेरी-कांदोळी येथे मासेमारीसाठी गेलेल्या नेरुळ येथील उमेश दाभोळकर (४०) या खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
Nerul fisherman death
Nerul fisherman deathDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सिकेरी-कांदोळी येथे मासेमारीसाठी गेलेल्या नेरुळ येथील उमेश दाभोळकर (४०) या खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. समुद्रात बुडाल्यानंतर उमेश यांनी फ्लोटरच्या साहाय्याने पोहत किनाऱ्यावर पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र, प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.

Nerul fisherman death
Goa ST Reservation: मोदी सरकारचा आदिवासी समाजाला मोठा दिलासा! एसटी आरक्षण प्रक्रियेला वेग; 6 ऑगस्टपासून लागू होणार नवा कायदा

उमेश हे त्यांचा भाऊ आणि अन्य दोन सहकाऱ्यांसोबत मोटारहोडीतून सिकेरी किनाऱ्यावर मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी सुरू असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे होडीत पाणी शिरले. त्यामुळे उमेश समुद्रात फेकले गेले.

Nerul fisherman death
Goa ST Reservation: आदिवासींचा दबाव कायम! आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत माघार नाही; गोवा सरकारवर 'उटा'चा पुन्हा मोठा प्रहार

त्यांना वाचविण्यासाठी सहकाऱ्यांनी तातडीने फ्लोटर समुद्रात फेकला. उमेश यांनी तो पकडला आणि पोहत किनाऱ्याच्या दिशेने येण्यास सुरुवात केली. पोहत-पोहत ते जवळपास किनाऱ्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी आलेल्या प्रचंड लाटेने त्यांना पुन्हा समुद्रात खेचून नेले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com