Ponda : सुदैवाने कोरोना रुग्ण संख्या कमालीची घटली, वातावरणातील बदलामुळे तापसरी
Ponda : सुदैवाने कोरोना रुग्ण संख्या कमालीची घटली, वातावरणातील बदलामुळे तापसरीDainik Gomantak

फोंड्यात ‘व्हायरल’ थंडीतापाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ

सुदैवाने कोरोना रुग्ण संख्या कमालीची घटली, वातावरणातील बदलामुळे तापसरी
Published on

फोंडा: फोंड्यात (Ponda) सध्या तापसरीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून त्यात लहान मुलांचा सहभाग आहे. वृद्धापासून ते मुलांपर्यंत थंडी, ताप, खोकला असून सुदैवाची बाब म्हणजे कोरोना रुग्णांचे प्रमाण मात्र अतिशय कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. वातावरणात बदल तसेच मागच्या दिवसातील ऊन पावसाचा खेळ यामुळे सध्याची तापसरी ही ‘व्हायरल'' असून एकमेकांपासून होणारा हा संसर्ग आहे, मात्र त्यात धोका नाही, काहीजण एकाच दिवसात बरे होतात, तर काहीजणांना आठवडा ढकलावा लागतो, असे डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली.

Ponda : सुदैवाने कोरोना रुग्ण संख्या कमालीची घटली, वातावरणातील बदलामुळे तापसरी
'तिळारी'चे दुरुस्तीकाम दुसऱ्या दिवशीही बंद

फोंड्यात आयडी उपजिल्हा इस्पितळाबरोबरच तालुक्यातील सर्वच खाजगी डॉक्टरांकडे या तापसरीचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत, मात्र त्यात कोरोना रुग्ण नसल्याने तेवढाच दिलासा रुग्ण आणि डॉक्टरांना मिळाला आहे. फोंडा शहरातील खाजगी दवाखान्यात तर सकाळीच गर्दी असते. त्यात लहानांपासून वृद्धांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश असतो. काही रुग्णांनी तर घरीच घरगुती उपचार करून या तापसरीतून सुटका करून घेतली आहे. ताप आल्यावर तपासणी करणे हे आवश्‍यक असून काहीजणांना तर एका दिवसाचा ताप आल्यानंतर लगेच बरे होण्याचा प्रकार घडला आहे. तापाची गोळी घेतल्यानंतर आजारपण गायब होत असले तरी तोंडाची चव बिघडत असल्याने आठवडाभर रुग्णाला त्रासदायक ठरत आहे. थंडी, खोकल्याचा त्रासही होत आहे. असल्याची माहिती काही रुग्णांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Ponda : सुदैवाने कोरोना रुग्ण संख्या कमालीची घटली, वातावरणातील बदलामुळे तापसरी
अनेक पक्षांत प्रवेशासाठी अतितटीची चढाओढ

कोरोनाचा आलेख घसरला!

फोंडा तालुक्यात कोरोनाचा आलेख घसरला आहे. रुग्णसंख्या कमालीची घटली असून सध्या फोंडा तालुक्यात फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ, मडकई, बेतकी - खांडोळा, शिरोडा व पिळये - धारबांदोडा आरोग्य केंद्रात मिळून केवळ पन्नासच सक्रीय रुग्ण आहेत.

तापसरीचा काय त्रास होतो...

रुग्णाला एका दिवसाचा ताप येतो. त्यात काहीजणांना खोकला, नाक गळणे, चोंदणे असा प्रकार होत आहे. आवाजावर परिणाम होण्याबरोबरच तोंडाची चव निघून जाते. एकंदर कोरोनासारखी सर्व लक्ष्षणे असली तरी कोरोनाचा प्रादूर्भाव मात्र आढळलेला नाही. काहींना सिझनल ॲलर्जी असते. त्यामुळेही सर्दी, ताप येतो. तरीपण प्रत्येकाने सतत दोन दिवस ताप आल्यावर डॉक्टराकडे तपासणी करणे आवश्‍यक असल्याचे मत डॉ. सुजय वळवईकर यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com