Goa Tourism: 2023 अखेरीस पर्यटकांची क्रुझ बोटिंगला पसंती

Goa Tourism: दररोज 2500 जणांची भेट: 87 टक्के देशी तर 3 टक्के विदेशींचा समावेश
Cruise In Goa
Cruise In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: गोव्याच्या​ पर्यटन क्षेत्रात बोटिंग हा महत्त्वाचा प्रकार पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. या क्रुझ बोटींवर दररोज सुमारे 87 टक्के देशी पर्यटक, 10 टक्के अनिवासी भारतीय आणि ३ टक्के परदेशी पर्यटक येतात. 2023 च्या वर्ष अखेरीसही सरासरी 2500 पर्यटक दरदिवशी क्रुझ बोटींगसाठी येत होते.

Cruise In Goa
Goa Accident News: डिचोलीत दोन वेगवेगळे अपघात; पर्यटक महिलेसह दोघे जखमी

पणजीतील मांडवी नदीच्या तिरावर क्रूझ बोटींगसाठी अनेक पर्यटक येतात. इथे त्यांना गोव्याचे पारंपारिक नृत्य, गाणी, नृत्य सत्र, गोव्याचे खाद्यपदार्थ आस्वादण्याची मुभा मिळते.

शांता इन्फ्राटेक, प्रायव्हेट लिमिटेडच्या महाव्यवस्थापक नंदिता नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की, डिसेंबर २०२१ पासून शांता इन्फ्राटेक कंपनी पणजी जेटी टर्मिनल इमारत आणि खुल्या जेटी क्षेत्राचे संचालन आणि देखरेख करत आहे, जी त्यांना पर्यटन विभागाने निविदा अंतर्गत दिली होती.

या जेटीवर काही बोटी पर्यटकांना उचलून सोडतात आणि काही बोटी कायमस्वरूपी उभ्या असतात. डिसेंबर महिन्या अखेरीस या जेटीवर दररोज सरासरी १२ क्रुझ बोटी कार्यरत होत्या. या सर्व बोटी दररोज एक ते तीन फेऱ्या करत होत्या.

Cruise In Goa
Goa Accident News: डिचोलीत दोन वेगवेगळे अपघात; पर्यटक महिलेसह दोघे जखमी

वर्षाअखेरीस पर्यटकांचे क्रुझ बोटिंगला येणे स्थिर होते. दिवसाला अनेक पर्यटक क्रुझ बोटींगसाठी यायचे. क्रुझ बोटींग हे पावसाळ्यात ५० टक्क्यांनी कमी होते. ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मे महिन्यात जेव्हा मुलांना सुट्टी असते तेव्हा अनेक कुटुंबे इथे क्रुझ बोटींगसाठी येतात.

-नंदिता नाईक, शांता इन्फ्राटेक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com