श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्‍ये ‘कोविड’ केंद्र

Rane1
Rane1

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात गेल्या चोवीस तासांत १६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून १८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६५६ आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाबतची परिस्थिती गंभीर होत चालली असून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील ५०० खाटांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली आणि तेथील परिस्‍थितीचा आढावा घेतला. लवकरच हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यासुद्धा या कोविड केअर सेंटरला लवकरच भेट देणार आहेत. रुग्णांवर चांगले उपचार होण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

५९३४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ५९३४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी २ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये २७ जणांना ठेवण्यात आले. १९०९ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २०९१ जणांचे अहवाल हाती आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ९३ रुग्ण आहेत. डिचोलीत ८, साखळीत ६३, पेडणेत ४, वाळपईत ९, म्हापशात ३७, पणजीत ५९, बेतकी येथे ७, कांदोळीत ३८, कोलवाळ येथे ५१, खोर्लीत २१, चिंबल येथे ७०, पर्वरीत १७, कुडचडेत १०, काणकोणात ५, मडगावात १११, वास्को येथे ३८१, लोटलीत २९, मेरशीत १५, केपेत ८, सांगेत ४, शिरोडा येथे १४, धारबांदोडा ३६, फोंड्यात ७७ आणि नावेलीत २३ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

- महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com